Bapu Pathare: शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की करणे पडले महागात; अजितदादांच्या 20 समर्थकांवर गुन्हा दाखल

Bapu Pathare Assault Case:बंडू खांदवे बाहेर येत असताना आमदार पठारे आणि खांदवे यांच्यात शाब्दिक वाद झाला. यानंतर झटापट झाली. आमदार पठारे यांना धक्काबुक्की करण्यात आली.
Bapu Pathare Sharad pawar
Bapu Pathare Sharad pawarsarkarnama
Published on
Updated on

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार बापू पठारे यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी एका सार्वजनिक कार्यक्रमात बापू पठारे आणि त्यांच्या समर्थकांना धक्काबुक्की झाली होती. शकील अजमोद्दीन शोख (वय ४६, रा. तुकारामनगर, खराडी) यांनी याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी बंडू खांदवे याच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

आमदार बापू पठारे यांना सार्वजनिक कार्यक्रमात धक्काबुक्की झाल्याने निर्माण झालेल्या गोंधळानंतर, त्यांच्या समर्थकावर झालेल्या मारहाणप्रकरणी बंडू खांदवे याच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे बंडू खांदवे यांच्यासोबत झालेल्या वादानंतर हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी शकील अजमोद्दीन शोख (वय ४६, रा. तुकारामनगर, खराडी) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोहगाव येथे शनिवारी म्हणजे 4 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी लोहगाव येथील एका स्थानिक कार्यक्रमादरम्यान आमदार पठारे आणि बंडू खांदवे शाब्दिक वाद झाला होता. वादाचे रुपांतर हाणामारी झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. रस्त्याच्या कामावरुन हा वाद झाल्याचे समजते.

Bapu Pathare Sharad pawar
Manchar Nagar Panchayat: इच्छुकांचे स्वप्न भंगले! ओबीसी महिला होणार नगराध्यक्षा; मंचरमध्ये पत्नीसाठी पती 'मैदानात'

लोहगाव येथील गाथा लॉन्स येथे हा प्रकार घडला. एका माजी सैनिकांच्या सत्काराचा नियोजित कार्यक्रम होता. बापूसाहेब पठारे या कार्यक्रमाच्या ठिकाणी येत होते. त्याच वेळी कार्यक्रमातून बंडू खांदवे बाहेर येत असताना आमदार पठारे आणि खांदवे यांच्यात शाब्दिक वाद झाला. यानंतर झटापट झाली. आमदार पठारे यांना धक्काबुक्की करण्यात आली. पठारेंच्या समर्थकांना ही माहिती कळताच त्यांचे समर्थक तसेच खांदवेंचे समर्थक देखील तेथे आले. त्यामुळे परिसरात तणाव वाढला होता.

पठारे यांना वाचविण्यासाठी पुढे आलेल्या शकील शेख यांना खांदवे यांच्या समर्थकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांची सोनसाखळी आणि रोकड असा ५१ हजार रुपयांचा ऐवज चोरी करून नेल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडू शहाजी खांदवे (रा. लोहगाव), शेखर मोझे, विलास खांदवे, कालिदास खांदवे, गणेश खांदवे, मेघराज खांदवे, प्रतीक खांदवे, रामेश्वर पोळ, सागर करजे, ओंकार ऊर्फ ओम्या खांदवे, हरिदास खांदवे, तुकाराम खांदवे, मंगेश खांदवे, रामदास खांदवे आणि अन्य पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

नेमके काय झाले?

लोहगाव परिसरातील जलवाहिन्या व सांडपाणी वाहिन्यांची कामे अपूर्ण असल्याने रस्त्यांची कामे सुरू करण्याची घाई करू नका, असे आमदार पठारे यांनी सांगितले होते. त्याबाबत जाब विचारण्यासाठी बंडू खांदवे आणि त्याचे साथीदार लॉन्सवर आले होते. यावेळी आमदार पठारे आणि खांदवे गटामध्ये वादावादी झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com