राष्ट्रवादीत नाराजीनाट्य; आमदार बेनकेंचे थेट अजितदादांना पत्र

Ajit Pawar|Uddhav Thackeray|Atul Benke : आमदार अतुल बेनके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पत्र पाठवले आहे.
Ajit Pawar & Atul Benke
Ajit Pawar & Atul BenkeSarkarnama

पुणे : बिबट्या सफारीचा मुद्दा घेऊनच आम्ही निवडणका लढलो. मात्र अर्थसंकल्पात (Budget) बारामतीच्या (Baramati) बिबट सफारीसाठी ६० कोटींची तरतूद केल्याने, जुन्नरची बिबट सफारी बारामतीला होणार या घोषणेमुळे जुन्नरची जनता व्यथित झाली आहे. यामुळे मला लोकप्रतिनिधी म्हणुन मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल. यामुळे हा प्रकल्प जुन्नर मध्येच व्हावा. या मागणीचे पत्र मंगळवारी (ता.१५ मार्च) जुन्नरचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना दिले आहे.

Ajit Pawar & Atul Benke
मुनगंटीवारांचा अजितदादांना सल्ला; बारामतीला हत्ती, अस्वल टायगर सफारी करा..

जुन्नरची प्रस्तावित बिबट्या सफारी बारामतीला स्थलांतरित झाल्यामुळे जुन्नर तालुक्यात मोठा रोष निर्माण झाला आहे. सफारीची मागणी आणि पाठपुरावा २०१६ पासून शिवसेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख आणि माजी आमदार शरद सोनवणे करत आहेत. मात्र, अर्थसंकल्पात अचानक बारामतीच्या बिबट सफारीसाठी निधीच्या तरतूदीची घोषणा झाल्याने जुन्नर तालुका ढवळुन निघाला आणि शिवसेना राष्ट्रवादी संघर्ष सुरु झाला. या संघर्षात उद्वीग्न लोकभावनेचा आदर करत आमदार बेनके यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री पवारांना पत्र देत, सफारी जुन्नराच करण्याची मागणी केली

Ajit Pawar & Atul Benke
पेन ड्राईव्ह बॉम्ब फडणवीसांवरच उलटला..

पत्रात बेनके म्हणाले, "२०१६ साली बिबट सफारी प्रकल्प जुन्नरला व्हावा, यासाठी तत्कालीन वनमंत्री यांच्या दालनात बैठक झाली होती. त्यास शासनाने अनुकूलता दाखवून संबधित विभागाचे सचिव, वास्तुविशारद यांनी आंबेगव्हाण येथील जागेची पाहणी करत, डिपीआरसाठी दिड कोटी रुपये मंजूर केले. त्यातील ६५ लाख अदा करणार होते. मात्र ते झाले नाहीत आणि हा प्रकल्प पुढे गेला नाही. तेव्हा पासून जनतेला या प्रकल्पाबाबत आश्‍वस्त केल्याने या प्रकल्पाबाबत जनतेमध्ये उत्सुकता होती. हेच मुद्दे घेऊन मी निवडणुक लढली. परंतू बजेट मध्ये हा प्रकल्प बारामतीला होणार या घोषणेमुळे जुन्नरची जनता व्यथित होऊन, जनक्षोभ उसळला.

शासनाचे धोरण जुन्नरला अनुकूल असताना, हा प्रकल्प बारामतीला नेण्याचा घाट का घातला जात आहे?, अशी लोकभावना झाली आहे. यामुळे जनतेच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे हा प्रकल्प जुन्नरलाच व्हावा, अशी माझ्यासह सर्वपक्षीय मागणी आहे. त्याचा सकारात्मक विचार व्हावा, अशी मागणी बेनकेंनी पाठवलेल्या पत्रामार्फत केली आहे.

Ajit Pawar & Atul Benke
दोन कोटींच्या जलयुक्त घोटाळा प्रकरणी दोन निवृत्त कृषी अधिकाऱ्यांसह चौघांना अटक

दरम्यान, जुन्नर मधील प्रस्तावित बिबट्या सफारी बारामतीला स्थलांतरित होण्याबाबच्या प्रकरणी भाजपचे नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बिबट्या सफारीसाठी जुन्नर हे पोषक वातावरण आहे. आणि जुन्नरमध्ये सफरीची गरज असल्याने सफारी जुन्‍नर मध्येच व्हावी, असे मत व्यक्त करत सगळेच प्रकल्प बारामतीला न नेता जिल्ह्याचा संतुलित विकास व्हावा, असा सल्ला अजित पवार (Ajit Pawar) यांना देत चिमटा काढला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com