मुनगंटीवारांचा अजितदादांना सल्ला; बारामतीला हत्ती, अस्वल टायगर सफारी करा..

Ajit Pawar| Sudhir Mungantiwar|BJP|Shivsena|NCP: एखाद्याला जेवायला बोलवायाचे आणि भरल्या ताटावरुन उठवायचे ही अजित पवारांची भूमिका योग्य नाही,असा टोमणा मुनगंटीवार यांनी लगावला आहे.
Sudhir Mungantiwar, Ajit Pawar
Sudhir Mungantiwar, Ajit PawarSarkarnama

पुणे : जुन्नर मधील प्रस्तावित बिबट्या सफारी बारामतीला स्थलांतरित होण्याबाबत प्रकरणी भाजप-शिवसेनेच्या मदतीला धावून आली आले. भाजपचे नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी बिबट्या सफारीसाठी जुन्नर हे पोषक वातावरण आहे. आणि जुन्नरमध्ये सफरीची गरज असल्याने सफारी जुन्‍नर मध्येच व्हावी. यासाठीची प्राथमिक मंजुरी मी वनमंत्री असताना दिली आहे. तर सगळेच प्रकल्प बारामतीला न नेता जिल्ह्याचा संतुलित विकास व्हावा, असा सल्ला पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना दिला आहे.

Sudhir Mungantiwar, Ajit Pawar
जुन्नरमधील बिबट सफरी बारामतीला जाऊ देणार नाही : अजितदादांच्या प्रस्तावाला शिवसेनेचा विरोध

मुनगंटीवार म्हणाले, "जुन्नर परिसरात बिबट्यांची समस्या गंभीर झाली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी बिबट्या सफारीचा प्रकल्पाला मी वनमंत्री असताना तत्त्वतः मान्यता दिली होती. मात्र यानंतर हा प्रकल्प पुढे सरकला नाही. तर आता हा प्रकल्प बारामतीला स्थलांतरित करणे हे राजकीय नीतिमत्तेला धरुन नाही. बारामतीला हत्ती, अस्वल टायगर सफारी करावी. मात्र बिबट्या सफारी जुन्नरलाच हवी. त्या सफारीला मी मंजुरी दिलेली आहे. प्रत्येक चांगला प्रकल्प बारामतीलाच व्हावा हा अजित पवार यांचा हट्ट चांगला नव्हे. एका चांगल्या प्रकल्पावरून राजकीय रोष संघर्ष निर्माण होणार नाही, अशी भूमिका हवी. तर एखाद्याला जेवायला बोलवायाचे आणि भरल्या ताटावरुन उठवायचे ही अजित पवारांची भूमिका योग्य नाही, असा टोमणा मुनगंटीवार यांनी पवारांनी दिला.

२०१६ पासून बिबट्या सफारी ही जुन्नरच्या आंबेगव्हाण परिसरात करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, राज्याच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात पवारांनी गाडीखेल (ता.बारामती) येथे बिबट्या सफारी प्रस्तावित करत, ६० कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद केली. यावरुन जुन्नर तालुक्यातील पर्यटन आणि पर्यावरणीय दृष्ट्या प्रकल्प बारामतीला स्थलांतरित होणार असल्यामुळे तालुक्यात राष्ट्र्वादी आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरु आहे. या संघर्षात शिवसेना संपर्कप्रमुख आणि आमदार सचिन अहीर यांनी देखील उडी घेतली आहे. तर हा संघर्ष शरद सोनवणे यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यामुळे अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Sudhir Mungantiwar, Ajit Pawar
दरेकरांनी आडनाव बदलून दरोडेखोर करावं! नाना पटोलेंचा खोचक सल्ला

बिबट्या सफारी जुन्नरलाच हवी - आमदार बेनके

जुन्नरची बिबट्या सफारी बारामतीला स्थलांतरित होण्याच्या बातम्यानंतर राजकीय दृष्ट्या बॅकफुटवर गेलेले आमदार अतुल बेनके आता सफारी जुन्नरलाच व्हावी यासाठी फ्रंटफुटवर आले आहेत. त्यांनी शरद सोनवणे यांच्या मागणीला पाठिंबा देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची सोनवणे यांनी वेळ घेऊन, बैठकीचे आयोजन करावे. मी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, वनराज्यमंत्री दत्ता भरणे यांच्या बोलून एकत्रित बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले आहे. तर आज (ता.१५ मार्च) विधानसभेत देखील मागणी करणार असल्याचे ‘सरकारनामा’ला सांगितले.

सफारीचा असा आहे प्रवास...

  • २००३ मध्ये तत्कालीन उपवनसंरक्षक अशोककुमार खडसे यांचा जुन्नर नगरपालिकेच्या कुंभार तलाव परिसरात सफारीचा प्रस्ताव. राजकीय अनास्थेमुळे प्रकल्प रेंगाळला

  • २००४ मध्ये तत्कालीन -वनमंत्री बबनराव पाचपुते यांचा बेलवंडी (जि.नगर) येथे आग्रह, यासाठी दक्षिण आफ्रिकेचा विशेष दौरा. मात्र प्रशासकीय अनास्थेमुळे प्रकल्प झाला नाही.

  • वनमंत्री दिवंगत पतंगराव कदम यांचा सह्याद्री टायगर रिझर्व्ह आणि पशुचिकित्सालयाची प्रस्ताव, टायगर रिझर्व्हला परवानगी, काम सुरु

  • २०१६ पासून जुन्नर वनविभागात सफारी प्रस्तावित, यासाठी आंबेगव्हाण आणि चाकणचा सर्व्हे, आंबेगव्हाणला तत्वतः मान्यता. मात्र डिपीआर अभावी बारगळला.

  • - २०२२ - पुणे वन विभागातील गाडीखेल (ता.बारामती) येथील सफारीसाठी अर्थसंकल्पात ६० कोटींची तरतूद

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com