Dattatray Bharne News : असं बनवलं आमदार दत्ता भरणेंना ‘मामा’; नेमकं काय घडलं...?

Crime News : इंदापूर तालुक्यातील दोघांचा अपघात झाला आहे. त्यांच्या मदतीसाठी पंधरा हजार रुपये फोन पे करा, असे सांगत इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांची फसवणूक झाल्याचा प्रकार घडला.
Dattatreya Bharne
Dattatreya BharneSarkarnama

Pune News : डिजीटल पेमेंट पद्धतीमुळे सायबर चोरीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली असून गेल्या काही दिवसांत ऑनलाईन फसवले जात आहे. अशास्वरूपाच्या घटनांमुळे काही सुशिक्षित मंडळींना याचा फटका बसला आहे.

इंदापूर तालुक्यातील दोघांचा अपघात झाला आहे. त्यांच्या मदतीसाठी पंधरा हजार रुपये फोन पे करा, असे सांगत इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांची फसवणूक झाल्याचा प्रकार घडला. (Dattatray Bharne News)

आमदार दत्तात्रय भरणे यांना चोरट्यांनी इमोशनल करत त्यांच्याकडून ऑनलाईन पैसे घेत फसवणूक केली. चोरटे भावनिक साद घालत लुटतात. याआधी काही अशी प्रकरणे आली आहेत. ज्यामध्ये काही चोरटे पैशांची मागणी करत असल्याचे पुढे आले आहे.

नेमकं काय घडलं...?

या फसवणुकीच्या प्रकाराबाबत माहिती देताना आमदार भरणे म्हणाले, मला एक फोन आला की इंदापूर तालुक्यातील दोघांचा अपघात झाला आहे. त्यांच्या मदतीसाठी तात्काळ पंधरा हजार रुपये फोन पे करण्यास सांगितले. त्यानंतर मदत करण्याच्या उद्देशाने तात्काळ मी एका सहकार्याला सांगून फोन पे करत तात्काळ पंधरा हजार रुपये पाठवले.

आणखी एका आमदाराला फसवले

त्यानंतर या अपघाताबद्दल इंदापूरमध्ये चौकशी केली. त्यावेळी याठिकाणी कोणाचाच अपघात झाला नाही, हा प्रकार समजल्यावर मला लक्षात आले की आपली फसवणूक झाली आहे. मात्र, मी याबद्दल कोणाला काही बोललो नाही. त्यानंतर आणखी एका आमदाराला अशा प्रकारे फसवले असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आपण योग्य ती खबरदारी घ्यायला हवी, असे दत्तात्रय भरणे (Dattatreya Bharne) यांनी सांगितले.

फोनवर कधीही ओटीपी देऊ नका

दरम्यान, अशा प्रकारे होणारी फसवणूक भविष्यात होऊ नये यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. कधीही कोणत्याही अनोळखी माणसाचा फोन आला आणि ओटीपी मागू लागला तर देऊ नका. चोरटे तुम्हाला बँक, आधार कार्ड, पॅन कार्ड व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही फोनवर कधीही ओटीपी देऊ नका. नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसेल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com