कबड्डीचे मैदान मारणारे भरणेमामा इंदापूरचे राजकीय मैदान पुन्हा मारणार काय?

आगामी निवडणुकांमध्ये राजकीय मैदानावर विरोधकांना बाद करत पुन्हा विजयी पतका फडकवणार काय, याची चर्चा स्पर्धेदरम्यान रंगली होती.
Dattatray Bharane
Dattatray BharaneSarkarnama
Published on
Updated on

पळसदेव (जि. पुणे) : इंदापूर (Indapur) तालुक्यातील पळसदेव येथे शालेय कबड्डी स्पर्धेच्या उद्‌टनादरम्यान आमदार दतात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांनी खेळात सहभाग घेत क्षणात दोन गडी बाद केले. ज्याप्रमाणे खेळाच्या मैदानात मामांनी बाजी मारली, त्याप्रमाणे आगामी निवडणुकांमध्ये राजकीय मैदानावर विरोधकांना बाद करत पुन्हा विजयी पतका फडकवणार काय, याची चर्चा स्पर्धेदरम्यान रंगली होती. (MLA Dattatray Bharane inaugurated the tournament by entering the kabaddi field)

गेल्या विधानसभा निवडणूकीच्या मैदानात आमदार दत्तात्रेय भरणे यांनी त्यांचे विरोधक माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला आहे. यापुढील काळातही आमदारकीची खुर्ची ताब्यात ठेवण्याच्या दृष्टीकोनातून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यात कोट्यवधींची विकासकामे आणली आहेत. विकासकामे करुनही टिकेला सामोरे जावे लागत असल्याची खंत त्यांच्या मनात आहे. ही खंत त्यांनी जाहीरपणे आज व्यक्त केली. मात्र, विकास कामांबरोबर जनतेचा आनंदही महत्वाचा असल्याने, एखाद्या मुलाने मला गोट्या खेळायचा आग्रह केला तरी त्याचा हट्ट मी पूर्ण करेन, असे जाहीर भाषणात त्यांनी सांगितले. यानंतर त्यांनी कबड्डी सामन्यात प्रत्यक्ष सहभाग घेत दोन गडी बाद करत स्पर्धेचे उद्‌घाटन केले.

Dattatray Bharane
छत्रपतींबद्दल अवमानकारक बोलताना राज्यपालांची जीभ झडली कशी नाही? : काँग्रेसचा संतप्त सवाल

येथील एल.जी. बनसुडे विद्यालयात तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा तीन दिवस चालणार आहेत. या वेळी आमदार दत्तात्रेय भरणे यांनी खासदार शरद पवार यांच्या फंडातून उभारलेल्या वर्गखोल्यांचे उद्‌घाटन व कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ केला. दरम्यान, विद्यालयातील दोन संघामध्ये सामन्याची सुरवात आमदार भरणे यांच्या हस्ते झाली. या वेळी मामांनी सलामी देत कबड्डी खेळात भाग घेतला. क्षणात एका संघातील दोन गडी बाद करुन उपस्थितांची मने जिंकली.

Dattatray Bharane
राज्यपालांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक : कोश्यारींचे धोतर फाडणाऱ्यास लाखाचे बक्षीस; पुण्यात झळकले फ्लेक्स

खेळाच्या सामन्यात बाजी मारलेल्या मामांना आगामी निवडणूकांत बाजी मारण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत. सध्या तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर आपलीच सत्ता यावी, या दृष्टीने आमदार दत्तात्रेय भरणे व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडून व्यूव्हरचना आखली जात आहे. ग्रामपंचायतीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होऊ शकतात. यामुळे जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न असतील. यामुळे नेतेमंडळी प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत लोकसंपर्क वाढविण्यावर भर देत आहेत. याचाच एक भाग म्हणून आजच्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनावेळी भरणे यांनी प्रत्यक्ष खेळात सहभाग घेत खेळाडूंना प्रोत्साहन दिले

Dattatray Bharane
महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा दुखावला; मुख्यमंत्री राजीनामा देणार?

यावेळी एल.जी. बनसुडे विद्यालयाचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे, कार्याध्यक्षा नंदा बनसुडे, डाॅ. शीतलकुमार शहा, तालुका क्रिडा अधिकारी महेश चावले, बाळासाहेब काळे, नितीन बनसुडे, सरपंच इंद्रायणी सुजित मोरे, उपसरपंच कैलास भोसले, जिल्हा बँकेचे बाळासाहेब चिंधे, प्राचार्या वंदना बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com