राज्यपालांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक : कोश्यारींचे धोतर फाडणाऱ्यास लाखाचे बक्षीस; पुण्यात झळकले फ्लेक्स

महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलही त्यांनी असेच विधान केले होते.
NCP's Flex
NCP's FlexSarkarnama

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत शनिवारी (ता. २० नोव्हेंबर) वाद्‌ग्रस्त विधान केले होते. त्यावरून राज्यात मोठा गदारोळ उठला असून राज्यपालांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. ‘राज्यपालांचे धोतर फेडणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस’ असे मजकूर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे फ्लेक्स पुणे शहरात (Pune) लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. (NCP aggressive against Governor Bhagat Singh Koshyari)

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप शशिकांत काळे यांनी शहरात फ्लेक्स लावून राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध नोंदविला आहे. काळे यांनी लावलेल्या फ्लेक्सवर म्हटले आहे की, आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श होते, आहेत आणि राहणारच... उतरत्या वयात धोत्रात घाण करण्यासारखे विषारी वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा जाहीर निषेध...

NCP's Flex
'आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान? महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतोय'

दरम्यान प्लेक्समध्ये खाली एक टीप लिहिण्यात आलेली आहे. त्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे धोतर फाडणाऱ्यास आणि फेडणाऱ्यास रोख एक लाख रुपयांची रक्कम देण्यात येईल, असेही काळे यांनी म्हटले आहे.

NCP's Flex
मोठी बातमी : ‘विनायक मेटेंच्या निधनानंतर शिंदे गटाकडून शिवसंग्राम फोडण्याचा प्रयत्न’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज जुन्या पिढीचे आदर्श होते, आता बाबासाहेब आंबेडकर ते नितीन गडकरी आदर्श आहेत असा उल्लेख केला होता. महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलही त्यांनी असेच विधान केले होते. राज्यपालांच्या या विधानाचा राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस पक्षाकडून समाचार घेण्यात येत आहे. दुसरीकडे, भाजप, शिंदे गट आणि मनसे यांनी मात्र यावर अजूनही चूपी साधल्याचे दिसून येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com