आमदार मेहिते पाटलांनी कार्यक्रमातच किरण आहेरांना लगावला टोला : म्हणाले...

बँकेचे पद आणि वर्चस्व विरोधकांना टोचल्याची चर्चा रविवारी जाहिर कार्यक्रमात झाली.
Mla Dilip Mohite
Mla Dilip Mohite sarkarnama
Published on
Updated on

राजगुरुनगर : राजगुरुनगर (Rajgurunagar) सहकारी बँकेवरील किरण आहेर (Kiran Aher) यांचे वर्चस्व आता संचालक मंडळातील काही संचालकाना टोचु लागले आहे. बँकेचे पद आणि वर्चस्व विरोधकांना टोचल्याची चर्चा रविवारी जाहिर कार्यक्रमात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार दिलीप मोहिते पाटलांनी (Dilip Mohite Patil) किरण आहेर यांचे बँकेवरील वर्चव्य कुन्हीतरी हिसकावुन घेत नाही म्हणुन सुटत नाही, असे सुचक वक्तव्य करत किरण आहेर यांना जाहिर कार्यक्रमात आव्हान दिले आहे.

राजगुरुनगर शहरात सी-लाई कपड्याच्या दालनाच्या उद्घाटन कार्यक्रमात दिलीप मेहिते पाटील बोलत होते. या वेळी सिनेअभिनेता सिद्धार्थ जाधव, राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष किरण आहेर, संचालक गणेश थिगळे, रेवननाथ थिगळे, सुरेश कौदरे, राजेंद्र वाळुंज, अरुण थिगळे उपस्थीत होते.

Mla Dilip Mohite
खळबळजनक : पुण्यातील मटका किंगची डोक्यात गोळी झाडून हत्या

राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक आणि माजी अध्यक्ष किरण आहेर यांनी आपले सहकारी आता चांगले तयार केले आतात. ते आपला चार्ज दुसरीकडे कधी देतात हे पहावे लागणार आहे, असे विधान मोहितेपाटलांनी करताच राजगुरुनगर बँकेचे माजी अध्यक्ष गणेश थिंगळेंनी भर कार्यक्रमात किरण आहेरांना टोला लावत पदाला चिटकुन बसले असुन बँकेवरील वर्चस्व सुटत नसल्याचे म्हटले. दरम्यान, मोहिते पाटील गणेश थिगळेंच्या विधानावर बोलताना म्हणाले आता कुन्हीतरी हिस्काऊन घेत नाही म्हणुन सुटत नाही. मोहिते पाटलांच्या या विधानामुळे बँकेच्या संचालक मंडळात सगळेच अलबेल नसल्याची चर्चा रंगली आहे.

Mla Dilip Mohite
राणेंना दुहेरी दणका; केंद्राच्या नोटीसीनंतर महापालिकेचीही कारवाई?

राजगुरुनगर सहकारी बँक हि पुणे (PUNE) जिल्ह्यातील सहकारी बँकांमध्ये अग्रगण्य बँक म्हणुन नावारुपाला आली आहे. या बँकेवर किरण आहेर यांचे वर्चस्व आहे. एकहाती सत्ता केंद्रीत करण्यात किरण आहेर आजपर्यत यशस्वी झाले आहेत. मात्र, आता त्यांच्याच गटातील एका संचालकाने एका खाजगी कार्यक्रमात किरण आहेरांना चिमटा काढला त्याला आमदार मोहितेपाटलांनी खतपाणी दिले. त्यामुळे पुढील काळात बँकेच्या निवडणुकीवर याचे परिणाम पहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com