Fortuner Accident Case : पुतण्याच्या चुकीची आमदार दिलीप मोहिते पाटील माफी मागणार

Dilip Mohite Patil : माझ्या पुतण्याच्या कारच्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला, तो घरच्यांचा एकुलता एक मुलगा होता.
Fortuner Accident Case
Fortuner Accident CaseSarkarnama
Published on
Updated on

Pune Crime News : पुण्यातील खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयूर मोहितेने विरुद्ध दिशेने येत फॉर्च्यूनर कारच्या धडकेत एका तरुणाचा जीव घेतला. या घटनेनंतर पुण्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले. मात्र पुतण्याच्या चुकीची माफी स्वतः आमदार मोहिते पाटील मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जुन्या पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर एकलहरे (ता. आंबेगाव) येथे घोड नदीच्या पुलाजवळ शनिवारी रात्री हा अपघात घडला. यात दुचाकीवरील ओम ऊर्फ बंटी सुनील भालेराव या 20 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तो कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुतण्याच्या या चुकीची माफी मागणार असल्याचे आमदार मोहितेंनी सांगितले.

ते म्हणाले, अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. पोलिस अपघाताची चौकशी करतील. पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास करावा. माझ्या पुतण्याच्या कारच्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला, तो घरच्यांचा एकुलता एक मुलगा होता. त्या तरुणाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन माफी मागणार आहे, असे आमदार मोहिते पाटलांनी (Dilip Mohite Patil) स्पष्ट केले आहे.

दरम्यान, आरोपी मयूर मोहिते याच्यावर मंचर पोलिसांनी कलम 304 (2), 337 आणि 338 आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Fortuner Accident Case
Fortuner Accident Case : फॉर्च्युनर अपघात प्रकरण: आमदार मोहितेंच्या पुतण्यास न्यायालयीन कोठडी

काही दिवासांपूर्वीच पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे अपघाताताने राजकारण तापले होते. त्यातच खेडच्या आमदाराच्या पुतण्याने एका युवकाला चिरडल्याने संतप्त नागरिकांनी मंचर पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. मात्र आरोपीला ताब्यात घेऊन गुन्ह्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर जमाव तेथून निघून गेला.

असा झाला अपघात

या प्रकरणी मृत ओमचे चुलते नितीन रामचंद्र भालेराव (रा.कळंब-सहाणेमळा, ता.आंबेगाव) यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शनिवारी रात्री कळंब गावातून जुन्या रस्त्याने मंचरच्या दिशेने भरधाव फॉर्च्यूनर कारने पिकअपला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीला धडक दिली. यात ओम रस्त्यापासून दहा ते बारा फूट फेकला गेला. त्याच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यास मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Fortuner Accident Case
MNS News : मनसेकडून विधानसभेची तयारी सुरु; 225 मतदारसंघात नेमणार निरीक्षक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com