Pune Accident News : पुण्यातील खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयूरने विरुद्ध दिशेने येत आपल्या भरधाव फॉर्च्यूनर कारने दुचाकीस्वारास धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार ओम ऊर्फ बंटी सुनील भालेराव याचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी अटक केलेल्या मयूर साहेबराव मोहिते पाटलास पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
हा अपघात जुन्या पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर एकलहरे (ता. आंबेगाव) येथे घोड नदीच्या पुलाजवळ शनिवारी रात्री घडली. अपघातानंतर तो कारमध्येच बसून होता, असा दावा मोहिते पाटलांनी केला. अपघाताची माहिती मिळताच मंचर पोलिस घटनास्थळी पोचले. त्यांनी मयूर मोहितेला अटक केली आहे. त्याच्यावर कलम 304 (2), 337 आणि 338 आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. आता न्यायालयाने मयूरला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे अपघातात प्रकरण देशभरात गाजले आहे. त्यात अल्पवयीन मुलाने भरधाव अलिशान कारने दुचाकीवरील दोघांचा जीव घेतला. हे प्रकरणी त्याच्या सर्व कुटुंबाला तुरुंगाची हवा खावी लागली. त्यातच खेडच्या आमदाराच्या पुतण्याने एका युवकाला चिरडले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मंचर पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर जमाव तेथून निघून गेला. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते.
या प्रकरणी मृत ओमचे चुलते नितीन रामचंद्र भालेराव (रा. कळंब-सहाणेमळा, ता. आंबेगाव) यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शनिवारी रात्री कळंब गावातून जुन्या रस्त्याने मंचरच्या दिशेने भरधाव फॉर्च्यूनर कारने पिकअपला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीला धडक दिली.
यात ओम रस्त्यापासून दहा ते बारा फूट फेकला गेला. त्याच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यास मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.