MNS News : मनसेकडून विधानसभेची तयारी सुरु; 225 मतदारसंघात नेमणार निरीक्षक

Political News: लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला बिनशर्थ पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता मात्र, मनसेने विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका घेत तयारी सुरु केली आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

Mumbai News : लोकसभा निवडणुकीचा धुरळा बसला असतानाच आता सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. निवडणुका संपल्यानंतर सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. त्यातच लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला बिनशर्थ पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता मात्र, मनसेने विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका घेत तयारी सुरु केली आहे.

मनसेने (MNS) गेल्या काही दिवसापासून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये 225 विधानसभा मतदारसंघात पक्षाचे निरीक्षक नेमण्यात येणार आहेत. त्यांच्याकडे त्या मतदारसंघाची जबाबदारी असणार असल्याचे समजते.

काही दिवसापूर्वी पक्षाच्या झालेल्या बैठकीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्वबळावर निवडणूक लढण्यास तयार रहा अशा सूचना मनसेच्या नेत्यांना दिल्या होत्या. त्यानंतर सर्वच जण आतापासूनच निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. सोमवारी होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यात स्वबळावर 200 ते 225 जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मनसे विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात महाविकास आघाडी (MVA), महायुती अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. ( MNS News)

Raj Thackeray
Radhakrishna Vikhe On Maratha Reservation : आम्हीही मराठा समाजासाठी काम करतोच; राधाकृष्ण विखे पाटील झाले आक्रमक...

महायुतीच्या अडचणीत वाढ

लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला (Mahayuti) बिनशर्थ पाठिंबा दिला होता. त्यामुळे काही मतदारसंघात महायुतीला विजय मिळवता आला होता. आता मात्र मनसेने विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे येत्या काळात याचा मोठा फटका महायुतीला बसण्याची शक्यता आहे.

Raj Thackeray
Mahayuti Dispute : मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेक आमदार महायुतीतून बाहेर पडणार; नागपूरच्या बड्या नेत्याचा दावा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com