Pimpri Chinchwad : पाचपैकी तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काल भाजपने दणदणीत विजय मिळवला.त्यातही मध्यप्रदेशात,तर त्यांनी बहुमतापेक्षाही जास्त जागा (163) जिंकून काँग्रेसला धोबीपछाड दिला.तेथील भोजपूरची जागा निवडून आणण्यात महाराष्ट्राचा हातभार लागला. भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावर पक्षाने या मतदारसंघाची जबाबदारी दिली होती. ती त्यांनी यशस्वी केली.
भाजपने महाराष्ट्रातील आपल्या काही दमदार नेत्यांना मध्यप्रदेशच्या मोहिमेवर धाडले होते. त्यात भोसरीचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) होते.त्यांच्याकडे रायसेन जिल्ह्यातील भोजपूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी ती निष्ठेने पार पाडली. त्यासाठी वीस दिवस तेथे ते तळ ठोकून होते. दिवाळीतही ते इकडे महाराष्ट्रात फिरकले नाहीत. भोजपूरमध्येच नेटाने प्रचार करत राहिले. त्याचे फळ त्यांना व त्यांच्या पक्षालाही रविवारी मिळाले.
भोजपूरमधून त्यांचे उमेदवार सुरेंद्र पटवा दणदणीत विजयी झाले. त्यांनी मुख्य प्रतिस्पर्थी कॉँग्रेसचे (Congress) राजकुमार पटेल यांचा 40 हजार 779 मतांनी पराभव केला.मतदारसंघात सर्वाधिक लिडने निवडून येण्याचा त्यांनी विक्रम केला. त्यांना एकूण 1 लाख 19 हजार 289 मते मिळाली.
यापूर्वी पक्षाने आमदार लांडगेंना गोव्यातील म्हापसा आणि कर्नाटकात एका मतदारसंघाची जबाबदारी त्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत दिली होती. ती त्यांनी चोख पार पाडली.तेथील पक्षाचा उमेदवार विजयी केला. परिणामी गोव्यात भाजपची सत्ता आली. कर्नाटकात भाजप हरला,तरी लांडगेंना जबाबदारी दिलेल्या मतदारसंघात त्यांचा उमेदवार विजयी झाला होता.ही कामगिरी लक्षात घेऊन त्यांना मध्य प्रदेशची मोहीम देण्यात आली. तेथेही ती यशस्वी करून त्यांनी आमदार करण्याची हॅट्ट्रिक केली.(Madhya Pradesh Assembly Election)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमदार लांडगे म्हणाले,त्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती मतदारांना दिली. मतदार मोठ्या संख्येने असलेल्या विविध समाजाची मोट बांधली.आरएसएस परिवारांच्या भेटी घेतल्या. मंडल शक्ती केंद्रप्रमुख,बुथ पन्नाप्रमुखांच्या बैठका घेतल्या. त्याचं रुपांतर पटवांच्या रेकॉर्ड ब्रेक विजयात झाले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.