Ravindra Dhangekar News : आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह 35 ते 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल !

Pune Lok Sabha Constituency Election : मतदानाच्या आदल्या दिवशी धंगेकर यांनी कार्यकर्त्यांसह सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ठाण मांडले होते. त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी काढलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आले...
Ravindra Dhangekar
Ravindra DhangekarSarkarnama

Pune News : पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि कसबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आचारसंहितेचा भंग करून धंगेकर यांनी बेकायदा जमाव जमविल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी त्यांच्यासह 35 ते 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

या बाबत पोलीस कर्मचारी अभिजीत बालगुडे यांनी सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांकडून कलम 143, 145, 149, 188 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 135. लोकप्रतिनीधी अधिनियम 1951 चे कलम 126 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी पुणे शहरात कलम 144 लागू केले होते. जमाव जमविण्यास बंदी घातलेली असताना देखील आमदार धंगेकर यांनी बेकायदा जमाव जमविला. पोलिसांनी काढलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवित धंगेकर यांनी भाजप विरोधात आंदोलन केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ravindra Dhangekar
Pune City Hording News : शहरातील 5 हजार होर्डिंगचे भूत पुणेकरांच्या मानगुटीवर !

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहीतेचा भंग करून बेकायदेशीर जमाव जमवुन व घोषणा देवुन वरील आदेशाचे उल्लंघन करताना मिळुन आल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी धंगेकर यांनी कार्यकर्त्यांसह सहकारनगर पोलीस (POLICE) स्टेशनमध्ये जाऊन ठाण मांडले होते. त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी काढलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष करत आंदोलन केल्याने पोलिसांनी आता आमदार धंगेकर यांच्यासह 35 ते 40 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

आमच्यावर गुन्हे, पैसे वाटणारे मात्र मोकाटच

सहकारनगर भागात बिनधास्तपणे पैसे वाटप केले जात असल्याचे समोर आल्यानंतर त्याची तक्रार घेऊन आम्ही सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये गेलो होतो. त्यावेळी तेथे भाजपचे (BJP) माजी नगरसेवक आणि दोनशे ते तीनशे कार्यकर्ते होते. जे पैसे वाटत होते, त्यांना पोलिसांनी मोकळे सोडले. आमच्यावर गुन्हे दाखल केले. पैसे वाटणाऱ्यांना मात्र पोलिसांनी मोकळे सोडले. त्यांच्या विरोधात काहीही कारवाई केली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अर्बन सेलचे अध्यक्ष नितीन कदम यांनी केला.

Ravindra Dhangekar
Sunil Tatkare : 'पहाटेच्या शपथविधी'वरुन तटकरेंचा गौप्यस्फोट; काँग्रेसचं 'ते' विधान अजितदादांच्या लागलं जिव्हारी!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com