Sangram Thopte : संग्राम थोपटेंचा अजित पवारांवर निशाणा; ‘राजगडला अडचणीत आणणाऱ्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे’

Rajgad Sugar Factory : भोर तालुक्यातील राजगड सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून (एनसीडीसी) राज्य सरकारच्या हमीवर 81 कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर झाले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर ती मदत रद्द करण्यात आली.
Ajit Pawar-Sangram Thopte
Ajit Pawar-Sangram ThopteSarkarnama
Published on
Updated on

Nasrapur, 28 September : भोर तालुक्यातील राजगड सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून (एनसीडीसी) राज्य सरकारच्या हमीवर 81 कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर झाले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर ती मदत रद्द करण्यात आली. राजगड काखान्याला अडचणीत आणण्याचे काम ज्या मंडळींनी केले, त्यांचा बंदोबस्त करणे आता गरजेचे आहे, अशा शब्दांत आमदार संग्राम थोपटे यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

राजगड सहकारी साखर कारखान्याची (Rajgad Sugar Factory) वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी झाली. त्या सभेत बोलताना साखर कारखान्याच्या मदतीमध्ये राज्य सरकारकडून झालेल्या दुजाभावाबाबत आमदार संग्राम थोपटे यांनी मनातील सल बोलून दाखवली. त्यांचा बोलण्याचा रोख हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे होता.

बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली होती. त्या लढतीत भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना मदत केली होती. त्यामुळे भोर विधानसभा मतदारसंघातून सुळे यांना मताधिक्य मिळाले होते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी राजगड सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून राज्य सरकारच्या हमीवर 81 कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर झाले होते. पण लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद साखर कारखान्याच्या थकहमीच्या मदतीवर उमटले आणि राजगड आणि नगर जिल्ह्यातील शंकरराव कोल्हे यांच्या कारखान्याला मंजूर झालेली रक्कम रद्द करण्यात आली होती. त्यामुळे राजगड कारखान्याच्या सभेत संग्राम थोपटे यांनी ही खंत बोलून दाखवली.

Ajit Pawar-Sangram Thopte
Umesh Patil : मोहोळची राष्ट्रवादीची जागा निवडून येत नाही, हे मी पक्षश्रेष्ठीला सांगितलंय; उमेश पाटलांचा गौप्यस्फोट

राजगड सहकारी साखर कारखान्याला राजकीय कोंडी करून अडविण्याचा आतापर्यंत प्रयत्न झाला आहे. आताही मदतीमध्ये दुजाभाव करण्यात आलेला आहे. राज्य सरकारच्या थकहमीवर राजगड साखर कारखान्याला मंजूर झालेले 81 कोटींचे अर्थसाहाय्य लोकसभेचा निकाल प्रतिकूल लागल्यानंतर रद्द करण्यात आला.

राजगडला मंजूर झालेले अर्थसाहाय्य रद्द करण्यात आल्यानंतर आम्ही साखर आयुक्त, मंत्री समिती, मुख्यमंत्री यांना भेटलो; परंतु समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. न्यायासाठी आम्ही शेवटी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहे. त्रुटी पूर्ण करून न्यायालयाने पुन्हा अर्ज करण्यात सांगितले आहे, त्यानुसार आम्ही प्रयत्न करीत आहोत. राजकीय सत्तांतर होते, सत्ता येते जाते; परंतु आजपर्यंत इतिहासात अशा पद्धतीचे काम पाहिले नव्हते, अशी टीका संग्राम थोपटे यांनी केली.

Ajit Pawar-Sangram Thopte
Umesh Patil : अजितदादांच्या 'त्या' कडवट टीकेनंतर उमेश पाटलांनी घेतला मोठा निर्णय

‘राजगडचे खासगीकरण करू नका’

माजी मंत्री अनंतराव थोपटे आणि शरद पवार यांनी उभा केलेला राजगड सहकारी साखर कारखाना निश्चितपणे चांगला चालेल. संचालक मंडळाने कारखाना विकू नये किंवा त्याचे खासगीकरण करू नये, अशी सूचना निवृत्त पोलिस अधिकारी तथा कारखान्याचे सभासद यशवंत कदम यांनी ऐनवेळच्या विषयात केली.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com