आमदार संजय जगतापांना धक्का; कट्टर समर्थक शिवतारे गटात सामील

माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी जगताप आणि त्यांच्या समर्थकांचे शिंदे गटात स्वागत केले.
Aniket Jagtap joins Shinde group
Aniket Jagtap joins Shinde groupSarkarnama
Published on
Updated on

सासवड (जि. पुणे) : काँग्रेसचे (Congress) पुरंदरचे (Purandhar) आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap)यांचे सासवड शहरातील कट्टर समर्थक अनिकेत जगताप यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या गटात प्रवेश केला आहे. जगताप यांच्यासह समर्थक कार्यकर्त्यांचा शिंदे गटातील प्रवेश आमदार जगताप यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay shivtare) यांनी जगताप आणि त्यांच्या समर्थकांचे शिंदे गटात स्वागत केले. (MLA Sanjay Jagtap's supporter Aniket Jagtap joins Shinde group)

अनिकेत जगताप हे सासवड शहरातील एक प्रथितयश व्यावसायिक मानले जातात. त्यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाला सासवडमध्ये चांगले बळ मिळणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जगताप यांच्या काँग्रेस पक्ष सोडण्याने आमदार जगताप गटाला हादरा बसला आहे.

Aniket Jagtap joins Shinde group
एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना महाराष्ट्राबाहेरही धक्का; 8 राज्यातील शिवसेना प्रमुखांचा पाठिंबा

माजी मंत्री शिवतारे म्हणाले की, मागील अडीच तीन वर्षांत तालुक्यात विकासाचा खेळखंडोबा झाल्याने युवकांचा आणि सामान्य माणसांचा भ्रमनिरास झाला आहे. तालुक्यातील महत्त्वाचे प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळात पळवले गेले. तालुक्याच्या आमदारांनी पुरंदरकडे दुर्लक्ष करत बारामतीशी इमान ठेवलं. आपल्या हक्काचं विमानतळ, गुंजवणीचं पाणी आणि राष्ट्रीय बाजार हे प्रकल्प पळवण्याचा प्रयत्न झाला. मात्र राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्तांतर झाल्यानंतर हे सगळे प्रकल्प पुन्हा तालुक्यात आणण्यात यश येत आहे. काँग्रेसच्या आमदारांनी तालुका दहा वर्ष मागे ठेवून ठेवला आहे. त्यामुळे युवक आणि सामान्य मतदार आता शिंदे यांच्या नेतृत्वाकडे झुकला आहे.

Aniket Jagtap joins Shinde group
शिवसेना नेत्याने घेतली एकनाथ शिंदेंची भेट अन्‌ कामाचे केले कौतुक!

अनिकेत जगताप म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विजय शिवतारे यांच्या नेतृत्वावर, कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन आम्ही युवकांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात तालुक्यात परिवर्तन होणार असून शिवतारे यांच्या नेतृत्वाशिवाय तालुक्याला पर्याय नाही, हे मागील तीन वर्षांत लोकांना जाणवले आहे.

या वेळी जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, उमेश गायकवाड, शहरप्रमुख डॉ.राजेश दळवी, नगरसेवक सचिन भोंगळे, डॉ.अस्मिता रणपिसे, नियोजन समितीचे माजी सदस्य कुंडलिक जगताप, युवा सेनेचे अध्यक्ष मंदार गिरमे, नितीन कुंजीर, प्रशांत वांढेकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com