Sunil Shelke : आमदार सुनील शेळकेंनी सांगितली महायुतीची पराभवाची कारणे, 'मराठा आरक्षण, जातीधर्मावर...'

Mahayuti Sunil Shelke : मराठा आरक्षण आणि तिन्ही पक्षांना मनोमिलनाला पुरेसा वेळ न मिळणे, ही कारणेही या अपयशाला कारणीभूत ठरली,असे देखील शेळके यांनी सांगितले.
Ajit pawar, Sunil Shelke
Ajit pawar, Sunil Shelke sarkarnama

Sunil Shelke News : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीची मोठी पिछेहाट झाली. 45 प्लसचा नारा दिलेल्या महायुतीला फक्त 17 जागा मिळाल्या. जातीधर्मावर ही निवडणूक झाल्याचा फटका बसला, अशी या पराभवाची कारणमीमांसा महायुतीतील राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) मावळचे आमदार, अजितदादांचे विश्वासू सुनील शेळके यांनी केली.

मराठा आरक्षण आणि तिन्ही पक्षांना मनोमिलनाला पुरेसा वेळ न मिळणे, ही कारणेही या अपयशाला कारणीभूत ठरली,असे देखील शेळके यांनी सांगितले. महायुतीच्या अपयशामागे विविध कारणे असली तरी जातीधर्मावर झालेली ही निवडणूक हे मुख्य कारण असल्याचे आमदार शेळके म्हणाले.

संविधान बदलाच्या चर्चेतून आरक्षणावर गदा येण्याच्या भीतीतून मुस्लिम,दलित आणि आदिवासींनी व्यक्त केलेला रोष आणि मराठा आरक्षण आंदोलनाचाही फटका बसल्याचे देखील त्यांनी सांगितले.

शेळके Sunil Shelke यांच्या मावळ मतदारसंघात कमी लीड मिळाले. बारणेंचे कमी लीड हे तुमचे अपयश नाही का? असे शेळकेंना विचारले असता ते म्हणाले, उमेदवारी देण्यापूर्वी काय कामे केलीत ती बारणेंनी सांगावीत,असे मी म्हणालो होतो. त्यात जनतेला तथ्य वाटले असावे, असे शेळकेंनी सांगितले. तसेच स्थानिक उमेदवार नसल्याने जनेतेने निराशा व्यक्त केली असे म्हणत कमी लीडचे खापर बारणेंच्याच डोक्यावर फोडले.

Ajit pawar, Sunil Shelke
Devendra Fadnavis : फडणवीसांचा भाजपसह मित्रपक्षांना मोलाचा सल्ला; 'आता एकमेकांवर खापर...'

अजितदादांमागे ठाम

लोकसभेच्या निकालानंतर अजित पवारांच्या सोबत असलेले आमदार, पक्ष फूटणार असल्याची चर्चा होती. या चर्चांवर पक्ष फुटेल की नाही, हे माहित नाही पण आज आम्ही एकसंध आहोत, असे शेळके म्हणाले. तसेच गुरुवारी (ता.6) अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी निवासस्थानी झालेल्या पक्षाच्या आमदार आणि खासदारांच्या बैठकीत अजितदादांमागे ठामपणे उभे राहणार असल्याचे ठरल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तुम्ही लोकसभेला तुम्ही लढला असता तर खासदार झाला असता? या प्रश्नावर मावळची जनता अद्याप कंटाळलेली नाही,असे विनोदाने शेळके म्हणाले.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com