Vasant More News : मोरेंना पंतप्रधान व्हायचंय, ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेत, 'राज'पुत्राची टीका !

Maha Vikas Aghadi & Uddhav Thackeray will not get a single seat in Mumbai : महाविकास आघाडी तसेच उद्धव ठाकरे यांना मुंबईत एकही जागा मिळणार नाही..
Amit Thackeray- Vasant More
Amit Thackeray- Vasant MoreSarkarnama

Pune Lok Sabha News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 'जय महाराष्ट्र' करत बाहेर पडलेले मनसेचे फायर ब्रँड नेते यांच्यावर मनसेच्या युवा सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी टीका केली आहे. अमित ठाकरे हे बुधवारी पुणे दौऱ्यावर आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शहर मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना सूचना केल्या.

पुण्यातील पत्रकारांशी गप्पा मारताना अमित ठाकरे यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यामागची भूमिकादेखील त्यांनी या वेळी मांडली. काही दिवसांपूर्वी मनसेला सोडचिठ्ठी देत पक्षाबाहेर पडलेले मनसेचे पुणे शहरातील नेते वसंत मोरे यांनादेखील आपल्या ठाकरे शैलीत अमित ठाकरे यांनी टोला हाणला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amit Thackeray- Vasant More
Lok Sabha Election 2024: अजितदादांचा व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचा गंभीर आरोप, म्हणाले; " हा तर आचारसंहितेचा भंग..."

वसंत मोरे यांनी मनसे सोडून वंचित बहुजन आघाडीकडून पुणे शहर लोकसभा निवडणुकीची जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मोरे यांना वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उमेदवारी दिली असून, त्यांनी वंचितमध्ये जाहीर प्रवेशदेखील केला आहे. मनसेकडून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी मोरे इच्छुक होते. मात्र, शहरातील पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्याने आपले नाव पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठविले नसल्याचा आरोप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर करत मोरे यांनी मनसेतून बाहेर पडणे पसंत केले होते.

मोरे यांच्या उमेदवारीबाबत अमित ठाकरे यांना विचारले असता, ते म्हणाले मोरे सोशल मीडियाच्या (social media) आहारी गेले आहेत. फेसबुक लाइव्ह, पोस्ट सतत ते करत असतात. त्यांना पंतप्रधान व्हायचे आहे. ते वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवित असले तरी त्यांनी मनसेकडून पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा राजसाहेबांचा आदेश पाळावा. महायुतीच्या प्रचारात त्यांनी सहभागी व्हावे, असे अमित ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडी तसेच उद्धव ठाकरे यांना मुंबईत एकही जागा मिळणार नाही. त्यांच्या विरोधात वातावरण असल्याचेही त्यांनी सांगितले.

Amit Thackeray- Vasant More
Amit Thackeray News : सन्मानानं प्रचारात घ्या, तरच सक्रिय होऊन प्रचार करू, 'राज'पुत्राने सुनावले !

देशात पुन्हा मोदी सरकार येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना महायुतीच्या माध्यमातून 300 च्या आसपास जागा मिळतील. तिसऱ्यांदा मोदी देशाचे पंतप्रधान होतील. मोदी सरकार करत असलेल्या विकासकामांकडे पाहूनच राजसाहेबांनी कार्यकर्त्यांचा विचार करून त्यानंतरच पंतप्रधान मोदी आणि महायुतीला बिनशर्त पाठिंब्याचा निर्णय घेतला असणार, असे अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत मनसेचे जे पदाधिकारी महायुती विरोधात प्रचार करतील त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची एकत्र सभा होण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com