Amit Thackeray News : सन्मानानं प्रचारात घ्या, तरच सक्रिय होऊन प्रचार करू, 'राज'पुत्राने सुनावले !

Pune Lok Sabha Constituency : महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी अमित ठाकरे यांची भेट घेऊन केली चर्चा ..
Pune Lok Sabha Amit Thackeray
Pune Lok Sabha Amit ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. असं असलं तरी अद्याप मनसैनिक प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसत नाहीत. त्यामुळे महायुतीला मनसे प्रचारात सक्रिय होऊन पाठिंबा देणार की, प्रचारापासून दूर राहून पाठिंबा देणार याबाबत स्पष्टता आलेली नव्हती. या पार्श्वभूमीवर पुण्यात आज मनसेने महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना प्रचारात सक्रिय सहभाग घेत पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट केलंय. मात्र, हा पाठिंबा देताना प्रचारात सन्मानाने सहभागी करून घ्यावं ही अट ठेवण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पुणे शहरातील विविध विभागांच्या बैठकांचे आयोजन केले होते. या बैठकांदरम्यान महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी अमित ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर अमित ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना प्रचारामध्ये सक्रियपणे सहभाग घेण्याचा सूचना केल्या. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना मनसे पदाधिकाऱ्यांना प्रचारात सन्मानाने सहभागी करून घ्यावे, अशी सूचनादेखील ठाकरे यांनी केली. मनसेच्या कार्यकर्त्यांना सन्मान द्यावा, असेही ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pune Lok Sabha Amit Thackeray
Ajit Pawar News : सून असल्या तरी तुम्हाला बाहेरच्या मानणार नाही; दादांनी पुन्हा घेतला साहेबांच्या विधानाचा समाचार

पुणे शहर मनसे (MNS) नेते बाबू वागस्कर म्हणाले, अमित ठाकरे यांनी शाखानिहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या असून, ज्याप्रमाणे राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दर्शवला आहे. त्याचप्रमाणे पुण्यात मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या प्रचारात सन्मानाची वागणूक घेऊन प्रचारात सहभागी होतील, असे सांगितले आहे.

मुरलीधर मोहळ म्हणाले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि महायुतीला पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर आज अमित ठाकरे हे पुण्यात आले असता त्यांची आणि इतर शहरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीवेळी अमित ठाकरे यांनी सर्व पदाधिकारी महायुतीच्या उमेदवाराचा सक्रिय प्रचार करणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला असून, आमचा विजय आणखी सोपा होणार आहे.

Pune Lok Sabha Amit Thackeray
Rohit Pawar Vs Ajit Pawar : अजितदादा सत्तेपासून दूर राहूच शकत नाहीत ; रोहित पवारांची टीका

मनसेचे पुणे (Pune) शहरांमध्ये मोठी संघटनात्मक ताकद आहे. एक वेळी मनसेचे 29 नगरसेवक पुणे शहरात होते. पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा ही विधानसभा मतदारसंघात मनसेची ताकद आहे. ही ताकद माझ्या मागे उभे राहिल्याने आता पुणे शहराचा विजय हा मोठा विजय होणार आहे, असा विश्वासदेखील मोहोळ यांनी व्यक्त केला.

Edited By : Chaitanya Machale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com