PCMC News : तुम्ही वाभाडे काढले, तर मी ही काढणारच; कारण तो आमचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे : राज ठाकरेंनी सुनावले

Raj Thackeray News : त्यांच्या या सभेने २०१४ च्या लोकसभा प्रचाराच्या चिंचवडच्या सभेची आठवण झाली.
Raj Thackeray Speech
Raj Thackeray SpeechSarkarnama
Published on
Updated on

Pimpri-Chinchwad News : 'पिंपरी-चिंचवड एडिटर्स गिल्ड' आयोजित पत्रकार हल्लाविरोधी परिषदेसाठी 'मनसे' चे अध्यक्ष राज ठाकरे हे आज (ता.१९) उद्योगनगरीत आले होते. यावेळी त्यांनी तुम्ही आमचे वाभाडे काढणार असाल, तर मी ही ते काढणारच, कारण तो आमचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे, असे मिडियालाच ठणकावले. तसेच चुकीच्या बातम्या देणाऱ्या पत्रकारांनाही सुनावत त्यातून त्यांच्यावर हल्ले होत असल्याचे सूचित केले. त्यांच्या या सभेने २०१४ च्या लोकसभा प्रचाराच्या चिंचवडच्या सभेची आठवण झाली.

चिंचवडचे स्वर्गीय भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून 'शेकाप'च्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते. त्यावेळी त्यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना प्रचारासाठी बोलावले. त्यांची चिंचवडला जाहीर सभा झाली. त्यात शहरातील अनधिकृत बांधकामे पाडलीच पाहिजेत असे राज म्हणाले. हा मुद्दा त्यांना ज्यांनी प्रचारासाठी आणले होते. त्या जगतापांच्या विरोधात गेला. कारण अनधिकृत बांधकामे ही अधिकृत करीत नाहीत, म्हणून जगतापांनी त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) सोडली होती. अपक्ष म्हणून ते रिंगणात उतरले होते. मात्र, राज यांनी अवैध बांधकामे पाडलीच पाहिजे, असे सांगितल्याने निवडणुकीचे वातावरण फिरले अन युतीचे श्रीरंग बारणे यांनी जगतापांचा पराभव केला.

Raj Thackeray Speech
Konkan News : शिंदे–फडणवीस सरकारच्या कारवाईचा धसका ? ठाकरेंच्या दोन्ही आमदारांचे महामार्गाच्या प्रश्नावर मौन

२०१४ च्या त्या चिंचवडच्या (Pimpri-Chinchwad) सभेची पुनरावृत्ती पुन्हा आज शहरात पत्रकार हल्लाविरोधी परिषदेत निगडी येथे झाली. पत्रकार व त्यांच्या संघटनांनी राज यांना त्यासाठी बोलावले. पण, त्यात त्यांनी पत्रकार आणि मिडियाचाच 'कार्यक्रम' केला. त्यांना त्यांनी खडे बोल सुनावले. चांगलाच आरसा दाखवला. चुकीच्या बातम्या देणाऱ्या पत्रकारांचे कान टोचले. वाया गेलेले अनेक पत्रकार प्रमुख हुद्यावर बसले असल्याचा दावा केला. काही पत्रकारांना लेबल लागली काही पत्रकारितेत घुसले आहेत, असा हल्लाबोल केला.

Raj Thackeray Speech
Beed Politics : प्रत्युत्तराबरोबरच शक्तीप्रदर्शनाचीही अजित पवार गटाची तयारी

सोशल मिडिया आणि इलेक्ट्राॉनिक्स मिडियावर त्यांचा रोख अधिक होता. तो स्पष्ट करताना न्यूज चॅनेलवर वाह्यात बोलणाऱ्या नेत्यांना का संधी दिली जाते, अशी विचारणा केली. चुकीच्या बातम्या दिल्या जात असल्याने पत्रकारांवर हल्ले होत असल्याचे त्यांनी सूचित केले. सोशल मिडियात ट्रोल करण्यासाठी राजकीय पक्षांनी लोकं पैसे देऊन ठेवली आहेत, असे ते म्हणाले. तर, अशा चुकीच्या बातम्या देऊन तुम्ही आमचे जाहीर वाभाडे काढणार असाल, तर मी राज ठाकरे आहे, असे सुनावत अंगावर याल, तर सोडणार नाही, मी तर वाभाडे काढणारच कारण तो आमचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे, असा इशारा त्यांनी मिडियालाच देऊन टाकला.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com