Beed Politics : प्रत्युत्तराबरोबरच शक्तीप्रदर्शनाचीही अजित पवार गटाची तयारी

Ajit Pawar public meeting : सभेत काही बडे प्रवेश देखील होणार आहेत.
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSarkarnama

Pawar Public Meeting In Beed : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी गुरुवारी बीडमध्ये घेतलेल्या स्वाभीमान सभेला उपुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे (ता. २७) ऑगस्टला बीडमध्येच प्रत्युत्तर देणार आहेत. मात्र, याच सभेच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) केली आहे. सभेत काही बडे प्रवेश देखील होणार आहेत.

सभेसाठी छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगणाची निवड केली असून कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या एकट्या परळी मतदारसंघातून समर्थकांना आणण्यासाठी १५० बसची मागणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे नोंदविली आहे. कार्यकर्त्यांची वाहने व इतर छोटी वाहने ही वेगळीच असणार आहेत. यासह स्थानिक बीड (Beed) मतदारसंघ आणि बाजूच्या गेवराई मतदारसंघातून देखील उपस्थितांची संख्या लक्षणीय असेल असे नियोजन आखण्यात आले आहे.

Ajit Pawar News
Narendra Modi Photo : भाजपने निषेध केला उद्धव ठाकरेंचा; मात्र फोटो जाळला पंतप्रधान मोदींचा, ठाण्यात नेमके काय घडले?

राज्यातील नव्या राजकीय समिकरणानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्राचा दौरा करण्याचे जाहीर केल्यानंतर अजित पवार यांनीही पवारांच्या सभा झालेल्या ठिकाणी सात दिवसांनी आपणही प्रत्युत्तर सभा घेण्याचे जाहीर केले होते. दरम्यान, पवारांचा येवला (जि. नाशिक) येथील सभेनंतर थांबलेला दौरा बीडच्या स्वाभीमान सभेने पुन्हा सुरु झाला. जिल्ह्यात एकटे आमदार असतानाही सभेची जबाबदारी आमदार संदीप क्षीरसागर यांनी लिलया पेलून दाखविली.

सभा होत नाही तोच बीडमध्येच अजित पवार यांची प्रत्युत्तर सभा जाहीर करण्यात आली. आता या सभेच्या तयारीलाही वेग आला आहे. शरद पवारांची सभा पारसनगरी मैदानावर झाली. यापेक्षा आकाराने मोठे असलेले छत्रपती संभाजी महाराज क्रिडा संकुल हे मैदान प्रत्युत्तर सभेसाठी निश्चित करण्यात आले आहे.

Ajit Pawar News
BJP MLA Will Split : काँग्रेस भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत; १५ ते २० आजी-माजी आमदार फुटणार?

आता सभेच्या पुर्वतयारीसाठी रविवारी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार प्रकाश सोळंके, आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार अमरसिंह पंडित आदी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील पक्षाच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक होणार असल्याची माहिती, जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण, युवक जिल्हाध्यक्ष विजयसिंह बांगर, महिला जिल्हाध्यक्षा ॲड. प्रज्ञा खोसरे यांनी दिली. दरम्यान, या सभेतून प्रत्युत्तर देण्यासह शक्तीप्रदर्शन करण्याची पूर्ण तयारी आणि त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

यासाठी बसची मागणी देखील नोंदविण्यात आली आहे. उपस्थितीची सर्वाधिक भिस्त परळी, बीड व गेवराई मतदारसंघावर असेल. या सभेत काही बडे प्रवेश देखील करण्याचे नियोजन सुरू आहे. सभेच्या निमित्ताने सत्ताधारी राष्ट्रवादीने (NCP) शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची सजावट करण्यासह शहरातील प्रमुख चौकांतील बॅनर देखील आतापासूनच बुक केले आहेत. धनंजय मुंडे यांचे विश्वासू व मॅनेजमेंटमधील वाक्ब्गार असलेले वाल्मिक कराड यांच्याकडे नियोजनाचे सर्व सुत्रे असून कराड व जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण शहरात तळ ठोकून आहेत.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com