Raj Thackeray News : सध्याच्या राजकारणाबाबत राज ठाकरेंना काय वाटतयं ?

Raj Thackeray News : राजकारणात यायचे की नाही, याबाबत नवी पिढी संभ्रमात आहेत,"
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज (रविवारी) जागतिक मराठी परिषदेत प्रकट मुलाखत झाली. यात त्यांनी सध्याचे राजकारण, बेरोजगारी यांच्यावर भाष्य केलं.

आजच्या राजकारणावर त्यांनी परखडपणे भूमिका मांडत हल्लाबोल केला. प्रकाश अकोलकर आणि प्रभाकर वाईरकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली.

राज ठाकरे म्हणाले, "सध्या राज्यात सुडाच्या राजकारणापेक्षा बडबड करण्याचे राजकारण सुरु आहे. राजकारणात येऊ पाहणारी पिढी याकडे गंभीरपणे पाहत आहे. रोज सकाळपासून वृत्तवाहिन्यांवर पकपक सुरु होते. यातून नवीन पिढ्या नष्ट होत आहेत. त्यामुळे राजकारणात यायचे की नाही, याबाबत नवी पिढी संभ्रमात आहेत,"

Raj Thackeray
MNS News : मुख्यमंत्री पदासाठी रश्मी ठाकरे यांनी उद्धव यांना आजारी पाडलं ; मनसेचा गौप्यस्फोट

हिंदी वृत्तवाहिन्याप्रमाणे ओरडून बोलण्याची प्रथा मराठी वृत्तवाहिनीमध्ये सुरु असल्याची खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

"आपण गुजरातचे आहोत म्हणून फक्त गुजरातला प्राधान्य देणं पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभत नसल्याचे राज ठाकरे म्हणाले.महाराष्ट्र हा सर्वार्थाने श्रीमंत आहे. एखादा दुसरा उद्योग बाहेर गेल्यानं राज्याचे फार नुकसान होणार नाही," असे राज ठाकरे म्हणाले.

सध्याची राजकीय स्थिती लयाला गेली आहे. जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करणे. त्यामध्ये महापुरुषांना खेचलं जात आहे. हल्ली कोणीही काहीही बोलत आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com