MNS News : मुख्यमंत्री पदासाठी रश्मी ठाकरे यांनी उद्धव यांना आजारी पाडलं ; मनसेचा गौप्यस्फोट

MNS News : रश्मी ठाकरे यांना नवऱ्याच्या मुख्यमंत्रीपदात काहीच रस नव्हता.
uddhav thackeray, Rashmi Thackeray
uddhav thackeray, Rashmi Thackeray sarkarnama
Published on
Updated on

MNS News : उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी ज्यावेळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यावेळी शपथविधी सोहळ्याच्या व्यासपीठावर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांना हात मिळवतानाचा उद्धव ठाकरेंचा एका फोटो खूप व्हायरल झाला होता.

त्यावेळी कुणी रश्मी ठाकरेंना 'फर्स्ट लेडी' म्हटलं, तर कुणी 'दुसऱ्या माँसाहेब' म्हटलं. त्या शिवसेनेच्या वर्तुळात आणि फारतर निवडक कार्यक्रमांमध्येच त्या दिसल्या. त्यापलिकडे त्या जाहीर व्यासपीठांवरून फार बोलत नाहीत, असे रश्मी ठाकरेंविषयी बोलले जाते.

पण "रश्मी ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांना खोटं आजारी पाडलं," अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी हा गंभीर आरोप केला आहे.

राज्यात आघाडी सरकार स्थापन करण्यात अन् मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंना राजी करण्यात रश्मी ठाकरें यांनी पुढाकार घेतला होता, अशा चर्चा रंगल्या होत्या. पण आता मनसेने थेट रश्मी ठाकरे यांचे नाव घेत नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात प्रकाश महाजन बोलत होते.

uddhav thackeray, Rashmi Thackeray
Sharad Pawar News : राज्यपालांविषयी शरद पवार म्हणाले अन् उपस्थितांमध्ये हशा पिकला..

प्रकाश महाजन म्हणाले, "मुख्यमंत्री पदासाठी रश्मी ठाकरे यांनी उद्धव यांना आजारी पाडलं. रश्मी ठाकरे यांना नवऱ्याच्या मुख्यमंत्रीपदात काहीच रस नव्हता. त्यांना आपल्या मुलाला मंत्री झालेलं पाहायचं होतं. त्यामुळेच हा आघाडीचा घाट घातला गेला,"

बाप भलं मोठं भांडवलं सोडून गेला होता..

"क्षणिक मुख्यमंत्रीपदासाठी पित्याने जपलेले राजकीय विचार उद्धव ठाकरेंनी सोडून दिले. बाप भलं मोठं भांडवलं सोडून गेला होता. दहा वर्षात त्या पक्षाचं पूर्ण वाटोळं करून आता बसलेत. शरद पवारांचा डाव होता अन् शिवसेनेचे दोन शकले झाले. उद्धव ठाकरे बापाचं भांडवल आणि बापचं नाव घेऊन आले. त्यांना बाकीचा काही अनुभव नाही. एखादी शाखा चालवण्याचा अनुभव नाही. हे सरकार स्थापन झालं. या सरकारनं असं काय केलं?," असा सवाल प्रकाश महाजन यांनी उपस्थित केला.

uddhav thackeray, Rashmi Thackeray
Teachers and Graduate constituency Election : भाजपच्या 'या' पाच नेत्यांवर मोठी जबाबदारी

अन् घरी सैरंद्रीने केस मोकळे सोडले..

"उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली होती की सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेल. त्यामुळे एकनाथ शिंदे टापटीप राहायचे. त्यांना वाटायचं आपणच मुख्यमंत्री होऊ. पण शिवसेनेतील या जोडगोळीने एक काम केलं. अन् घरी सैरंद्रीने केस मोकळे सोडले. सैरंद्रीने केसं मोकळे सोडल्यावर काय होतं हे तुम्हाला माहीतच असेल," असे महाजन म्हणाले.

त्यांना मुलाला मंत्री करायचं होतं..

"घरच्या तापापायी ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि कारभार सुरू केला. सैरंद्रीला नवरा मुख्यमंत्री होतो की नाही यात काही रस नव्हता. त्यांना मुलाला मंत्री करायचं होतं. मुळातच औकात… म्हणजे क्षमता… औकात नसलेल्या माणसाला गादीला बसवलं. मला संशय आहे की आजारपण सुद्धा खरं की खोटं होतं. कारण कारभार यांना करायचा होता. त्यामुळे यांना आजारी पाडलं अन् कारभार सुरू केला," असा गंभीर आरोप महाजन यांनी यावेळी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com