raj thackeray
raj thackeraysarkarnama

Kasba By Election: मनसेनं पाठिंबा द्यावा,त्यांचा एक आमदार वाढेल; 'या' उमेदवाराची ऑफर,ठाकरे काय निर्णय घेणार?

Raj Thackeray & Hindu Mahasangh : मनसेनं कसबा निवडणुकीत मला पाठिंबा दिला, तर माझा विजय सुकर होईल.

Pune Political News : कसबा पोटनिवडणुकीत भाजपा आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये थेट लढत होत आहे.मात्र, याचवेळी आपसह इतर पक्षांनीही या निवडणुकीत उडी घेतल्यानं ही लढत रंगतदार होणार आहे. परंतू, मनसेनं या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार दिलेला नाही, आणि कोणत्याही पक्षाला पाठिंबा देखील जाहीर केलेला नाही.

याच धर्तीवर आता कसबा पोटनिवडणुकीतील(Kasba By Election) हिंदू महासंघाच्या उमेदवाराने राज ठाकरेंना मोठी ऑफर दिली आहे. आता या ऑफरवर ठाकरे काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

भाजप व काँग्रेस उमेदवारांनी कसबा पोटनिवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरु केला आहे. तसेच आप, संभाजी ब्रिगेड, हिंदू महासंघ यांच्यासह इतरही उमेदवारांनी भेटीगाठी, बैठका, सभा, रॅली यांसह विविध माध्यमातून प्रचारात आघाडी घेतली आहे. पण आता हिंदू महासंघाचे उमेदवार आनंद दवे यांनी मनसे(MNS)ला खुली ऑफर दिली आहे. त्यांनी कसबा पोटनिवडणुकीत मनसेनं आपल्याला पाठिंबा द्यावा त्यांचा एक आमदार वाढेल असं विधान केलं आहे. यामुळे दवेंच्या ऑफरवर मनसे काय भूमिका घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठऱणार आहे.

raj thackeray
Uddhav Thackeray: '' वाडा पडला तरी अहंकाराचा...''; थोरात-पटोले वादावरुन ठाकरे गटानं काँग्रेसचे टोचले कान

आनंद दवे काय म्हणाले?

मनसेला ऑफर देताना दवे म्हणाले, राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांनी कोणाचाही प्रचार करू नये असा आदेश काढला आहे. मात्र त्यांच्या आणि आमच्या भूमिका सारख्याच आहेत.त्यांचं आणि आमचं हिंदुत्व आक्रमक आहे. आरक्षणाची भूमिकाही सारखीच आहे.समर्थ रामदास स्वामी आणि बाबासाहेब पुरंदरे यांबाबत आमची मतेही मिळतीजुळती आहे.

त्यामुळे मनसेनं कसबा निवडणुकीत मला पाठिंबा दिला, तर माझा विजय सुकर होईल. माझं मताधिक्य वाढेल. इतर कोणत्याही पक्षाबरोबर जाऊन किंवा तटस्थ राहून मनसेला काहीच फायदा होणार नाही. राज ठाकरेंनी याचा विचार करावा असेही आनंद दवे (Anand Dave) यावेळी म्हणाले आहेत.

raj thackeray
Congress : काँग्रेस डेंजर झोनमध्ये ; निष्ठावंत नेता का दुखावला जातो ?

राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना महत्वपूर्ण आदेश

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना महत्वपूर्ण आदेश दिले आहेत. त्यांनी पुण्यातील पोटनिवडणुकांमध्ये माझे पुढील आदेश येईपर्यंत कुणीही प्रचारात सहभागी होऊ नका अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पदाधिकारी प्रचारात आढळून आल्यास मनसे (Mns)कडून कारवाई केली जाणार असल्याचाही इशाराही दिला आहे. कसबा पोटनिवडणुकीत तटस्थ राहणार असल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com