MNS : मी मनसे सोडावी, असं पक्षातील काहींना वाटतयं..; मोरें म्हणाले, मी राज साहेबांना स्पष्ट सांगितलं..

mns vasant more : मी एकटाच पक्षहितासाठी कायम भांडत राहिल.
Raj Thackeray News, Vasant More News, MNS News
Raj Thackeray News, Vasant More News, MNS NewsSarkarnama
Published on
Updated on

mns vasant more : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुण्यातील कट्टर समर्थक, माजी शहर अध्यक्ष, नगरसेवक वसंत मोरे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. वसंत मोरे गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी त्यांना पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे वसंत मोरे राष्ट्रवादीत प्रवेश कऱणार का? अशी चर्चा रंगली आहे.

वसंत मोरेंची नाराजी दूर करण्यासाठी अमित ठाकरे यांनी पुण्यात त्यांना भेटीसाठी बोलावलं होतं. या भेटीनंतर वसंत मोरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मनसेचे कार्यालयात वसंत मोरे का जात नाही, याबाबत त्यांनी "सरकारनामा" शी संवाद साधला. त्यांनी याविषयी भाष्य केलं.

मनसेच्या शहर कार्यालयात वसंत मोरे जात नाही, याबाबत खुद्द मोरे यांनी यांचे कारण सांगितले. जुन्या शहर कार्यालयाबाबत त्यांनी सांगितले की, त्या शहर कार्यालयाबाबत आम्हाला महापालिकेची तीन वेळा नोटिस आली होती. जी वास्तू पडणार आहे , या वास्तुत राहून आपण लढणार असू तर आपण जिंकणार नाही, असे मी राजसाहेबांना सांगितले होते.

"मी नवीन कार्यालय केलं. पण याठिकाणी कोणीही पदाधिकारी फिरकले नाहीत, साईनाथ बाबर एकदाच त्या ठिकाणी आले होते. "२०२२च्या निवडणुकीत गुलाल त्या वास्तुत उधळेल. सगळ्यात जास्त नगरसेवक निवडूक येतील तेव्हा मी येथे पेढे वाटणार, अशी स्वप्न मी त्या वास्तुत पाहिली होती," असे मोरे म्हणाले.

Raj Thackeray News, Vasant More News, MNS News
Maharashtra Government : शपथविधीसाठी शिवलेल्या कपड्याचे काय ? ; मंत्रीपदासाठी इच्छुक आमदारांना प्रश्न

मी फुलं वेचली, त्या ठिकाणी मी काटे वेचणार नाही..

"पद येत असतात, जात असतात, अजय शिंदे सलग सहा वर्ष अध्यक्ष होते. माझ अध्यक्षपद एका विशिष्ठ मागणीनं गेल. ते साऱ्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे. माझे पद गेल्यानंतर त्या ठिकाणी गुलाल उधळण्यात आला. पेढे वाटण्यात आले, मिरवणुका काढण्यात आले. त्या तिथे गेल्यावर मला त्यांचा त्रास होतो. त्यामुळे या कार्यालयात मी जात नाही, याबाबत मी राज ठाकरेंना सांगितलं की तुम्ही येणार तेव्हाच मी या कार्यालयात येईल." असे मोरे यांनी सांगितलं. "ज्या ठिकाणी मी फुलं वेचली, त्या ठिकाणी मी काटे वेचणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केलं.

एकटा पाडण्यासाठी एकजूट कशासाठी ?

"मी मनसेतून अन्य पक्षात जावं असे आता काहींना वाटायला लागलं, कारण मनसेमध्ये यासाठी एकजूट दाखवली जात आहे. हीच एकजूट जर पक्षवाढीसाठी दाखवली असती तर चांगले होईल, वसंत मोरे यांना एकटा पाडण्यासाठी एकजूट कशासाठी करतात ? मी एकटाच पक्षहितासाठी कायम भांडत राहिल. तुमच्याकडून पक्षासाठी चांगलं काम होत असेल तर करा,"

राज ठाकरे यांच्या बरोबर असलेले मोरे त्यांच्याच एका भूमिकेमुळे नाराज झाले होते. राज ठाकरे यांनी मशिदिवरील भोंग्यांविरोधात आंदोलन पुकारले आणि तिथेच माशी शिंकली. मोरेंनी वेगळी भूमिका घेतली, आणि ठाकरेंची नाराजी ओढवून घेतली. त्यानंतर त्यांचे शहराध्यक्षपद गेले आणि पुण्यातील मनसे संघटना आणि मोरे यांच्यात अंतर पडत गेले. ते अंतर आता वाढत गेले आहे. आता अमित ठाकरे यांच्या भेटीनंतर मोरे यांच्या संदर्भात मनसे काय भूमिका घेते हे पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com