Maharashtra Government : शपथविधीसाठी शिवलेल्या कपड्याचे काय ? ; मंत्रीपदासाठी इच्छुक आमदारांना प्रश्न

Eknath Shinde : मंत्रिपदाची स्वप्नं पाहिलेल्या आमदारांच्या पदरी निराशा
Devendra Fadanvs and Eknath Shinde
Devendra Fadanvs and Eknath ShindeSarkarnama

Eknath Shinde : गेल्या तीन महिन्यांपासून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. 'तारीख पे तारीख' पडत असल्याने मंत्रिपदाची स्वप्नं पाहिलेल्या आमदारांच्या पदरी निराशा पडली आहे. अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता मावळली आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या समर्थक आमदारांना दिला होता. यासाठी शपथविधीसाठी काही आमदारांनी मुंबईतील प्रख्यात टेलरकडून कपडे शिवून ठेवले आहेत. आता हे कपडे मंत्रीपदासाठी इच्छुक आमदारांना कधी परिधान करायला मिळतील,अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Devendra Fadanvs and Eknath Shinde
Ribaba Jadeja : “हॅलो, आमदार ! तू खरोखरच यासाठी पात्र आहेस..,असे रवींद्र जडेजा का म्हणाले ?

शिंदे सरकारविरोधात चहूबाजूंनी टीका सुरू आहे. राज्यपालांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेली वादग्रस्त विधान, कर्नाटक सीमाप्रश्नावरुन विरोधकांनी सरकारला घेरले आहे. अशा परिस्थितीत मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनानंतर करण्याचे ठरले आहे.

विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी शिंदे यांनी आपल्याकडील खात्यांचा कार्यभार आपल्या गटाच्या मंत्र्यांकडे सोपवला आहे. मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता नसल्याने अधिवेशनात आपल्या गटाच्या आमदारांना सांभाळण्याची कसरत मुख्यमंत्री शिंदे यांना करावी लागणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आपल्याकडील खाती भाजपच्या मंत्र्यांकडे दिलेली नाहीत.

मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनानंतर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी अपेक्षा असलेल्या इच्छुक आमदार नाराज झाले आहेत.

Devendra Fadanvs and Eknath Shinde
Basavaraj Bommai : अमित शाह यांच्या भेटीवरुन बोम्मई बरळले ; म्हणाले..

असे आहेत तात्पुरते खाते वाटप

  • उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान खाते दिले आहे.

  • राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे राज्य रस्ते विकास खाते दिले आहे.

  • विशेष सहाय्य हे खाते संजय राठोड यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

  • जलसंधारण खाते हे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना दिले आहे.

  • अल्पसंख्याक खाते हे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना दिले आहे.

  • पर्यावरण खाते हे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सोपविले आहे.

  • संदिपान भुमरे यांच्याकडे मदत व पुनर्वसन खाते दिले आहे.

  • गुलाबराव पाटील यांच्याकडे माहिती व जनसंपर्क खाते दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com