Mns News : पाठिंबा भाजपला अन् कार्यालयात स्वागत काँग्रेसच्या उमेदवाराचं,अखेर मनसेनं दिलं 'हे' स्पष्टीकरण

Ravindra Dhangekar Vs Hemant Rasne : महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी अचानक मनसेच्या शहर कार्यालयाला भेट दिली होती.
Mns News
Mns News sarkarnama

Kasba By Election : कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु आहे. भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून नेत्यांच्या सभा, भेटीगाठी, बैठका यांनी राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे मनसेनं कसबा, चिंचवडमध्ये भाजप उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला आहे. मात्र, याचवेळी कसबा मतदारसंघात महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी अचानक मनसेच्या शहर कार्यालयात जात मनसे नेत्यांची भेट घेतली. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर(Ravindra Dhangekar) यांनी नवी पेठमधील मनसे कार्यालयात भेट दिली होती. यावेळी मनसे पदाधिकारी मित्रांनीही धंगेकर यांचं स्वागत केलं. विशेष म्हणजे कालच मनसेनं भाजपला पाठिंबा जाहिर केला आहे. तरीही मविआ उमेदवाराने आज ठरवून मनसे कार्यालयास भेट दिली. कारण धंगेकर हे पूर्वाश्रमीचे मनसैनिकच आहेत. मात्र,मनसे कार्यालयाला भेट दिल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

मात्र, आता मनसेकडून धंगेकरांच्या मनसे कार्यालयाच्या भेटीवर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे यांनी एका पत्रक प्रसिध्द केले आहे. यामुळे राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

मनसेच्या पत्रकात नेमकं काय म्हटलंय?

पुणे शहर मनसे कार्यालयात कोअर कमिटीची साप्ताहिक बैठक चालू होती. दर गुरुवारी ही बैठक असते. त्यावेळी समोरुन महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची पदयात्रा सुरु होती. त्यादरम्यान ते महाविकास आघाडीचे नेते - कार्यकर्ते अचानक थेट मनसे कार्यालयात आले. घरात आलेल्या व्यक्तीला भेटणे आणि त्याच्याशी बोलणे ही आपली संस्कृती आहे. त्याप्रमाणे २ मिनिटात ते भेट घेऊन घेऊन बाहेर पडले असं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

Mns News
Pune Police: पोटनिवडणुकीच्या धामधुमीतच पोलिसांची मोठी कारवाई; एका रात्रीत तब्बल 521 जणांना अटक

'या' दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी...

पुढे पत्रकात धंगेकरांच्या मनसे कार्यालयातील भेटीनंतरच्या चर्चांवर भाष्य केलं आहे. पत्रकात मनसेची भूमिका स्पष्ट करताना म्हटलंय, धंगेकरांच्या मनसे कार्यालय भेटीनंतर संभ्रम निर्माण होणाऱ्या बातम्या काही ठिकाणी प्रसिध्द झाल्या आहेत. खरंतर आपल्याकडे आलेल्या व्यक्तीला भेटणे आणि निवडणुकीत पाठिंबा देणे या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत.

Mns News
Girish Bapat : बापट म्हणाले... हेमंतचं काम चांगलं; थोडं नागरिकांपर्यंत पोहचण्याची गरज

तसेच राजसाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आधीच कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि चिंचवड मतदारसंघात अश्विनी जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मनसेनं पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे या संदर्भात कुठलाही संभ्रम निर्माण करण्यात येऊ नये असंही पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com