Amol Kolhe News : ब्रम्हसंकटामुळे खासदार कोल्हे चिंचवडच्या प्रचारापासून जाणीवपूर्वक राहिलेत दूर!

NCP News : राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे प्रचारापासून दूरच...
Amol Kolhe News
Amol Kolhe NewsSarkarnama
Published on
Updated on

Chinchwad by-election : पक्षाचे मंथन शिबिर, बैठका, कार्यक्रमांना दांडी, त्याचवेळी पक्षाने बहिष्कार टाकलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला, मात्र हजेरी, रावसाहेब दानवेपासून अमित शहापर्यंतच्या भाजप (BJP) नेत्यांच्या भेटीगाठी यामुळे ते भाजपमध्ये जाणार इतपर्यंत बातम्या आलेल्या व त्यामुळे अनेकदा चर्चा झालेले शिरूरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे पुन्हा जोरदार चर्चेत आले आहेत. कारण त्यांच्या पक्षाने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारापासून ते जाणीपूर्वक चार हात दूर राहिले आहेत.

नमूद करण्याजोगी बाब म्हणजे अध्यक्षांसह पक्षाचे दिग्गज नेते चिंचवडसह कसबा पेठच्या पोटनिवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झालेले असताना फर्डे वक्ते आणि त्यामुळे लोकसभा गाजविणारे कोल्हे हे या प्रचाराला न आल्याने त्याची मोठी चर्चा सध्या सुरु आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी ते पक्षाचे स्टार प्रचारक आहेत. तरीही ते प्रचारात सामील झालेले नाहीत हे विशेष.

Amol Kolhe News
Satara : श्रीनिवास पाटील : संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग दाखवणारे खासदार

आता प्रचारासाठी फक्त उद्याचा दिवस उरलेला आहे. दुसरीकडे कोल्हेंनी जाणीवपूर्वक शहराबाहेर दूर राहणे पसंत केले आहे. त्याला कारणही तसेच त्यांना ब्रम्हसंकटात टाकणारे असेच आहे. त्यांचे जवळचे स्नेही आणि त्यांच्या प्रचंड गाजलेल्या व जिचा ते खासदार होण्यात मोठा वाटा राहिला आहे, अशा स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेचे एक वित्त पुरवठादार राहिलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते राहूल कलाटे हे बंडखोरी करून अपक्ष म्हणून चिंचवड निवडणुकीत उभे आहेत.

तर, त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार हे महाविकास आघाडीतील डॉ. कोल्हेंच्या राष्ट्रवादीचे (NCP) नाना काटे आहेत. त्यामुळे स्टार प्रचारक असूनही ते आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले नाहीत. त्यातून त्यांनी कलाटेंची मैत्री जपल्याचे बोलले जात आहे. तसेच पक्षातील नाराजीमुळे आणि भाजपच्या सलगीतून ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा यापूर्वी झाली होती. त्या भाजपचाही उमेदवार चिंचवडसह कसब्यात आहे. त्यामुळे भाजपच्या सलगीतून ते या प्रचारापासून दूर राहिले अशीही कुजबूज ऐकू आली आहे.

Amol Kolhe News
Kasba By Election : भाजपचे माजी आमदार परिचारकांचा कट्टर समर्थक पुण्यात करतोय काँग्रेसच्या धंगेकरांचा प्रचार

मात्र, इकडे आड, तिकडे विहीर या ब्रम्हसंकटातून ते जाणूनबुजून या प्रचाराला आले नाहीत, असे त्यांच्या निकटच्या वर्तूळातून 'सरकारनामा'ला सांगण्यात आले. नाशिकनंतर निपाणीत त्यांच्या महानाट्याचे प्रयोग होणार असून त्याच्या तयारीचे कारण त्यासाठी त्यांनी दिले आहे. मात्र, पक्षाची हल्लाबोल यात्रा प्रभावी वक्तृत्वामुळे गाजविणारे कोल्हे हे चिंचवडच्या प्रचारात सामील झाले असते, तर त्याचा पक्षाच्या उमेदवाराला निश्चीत मोठा फायदा झाला असता, असे राष्ट्रवादीच्या पिंपरी-चिंचवडमधील एका जबाबदार पदाधिकाऱ्याने सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com