Kasba By Election : भाजपचे माजी आमदार परिचारकांचा कट्टर समर्थक पुण्यात करतोय काँग्रेसच्या धंगेकरांचा प्रचार

पंढरपुरातील परिचारक आणि भाजप गोटात खळबळ उडाली आहे.
Prashant Paricharak's supporter
Prashant Paricharak's supporterSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांचे कट्टर समर्थक आणि भाजपचे (BJP) कार्यकर्ते हे पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे (Congress) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा प्रचार करत आहेत. त्यामुळे पंढरपुरातील (Pandharpur) परिचारक आणि भाजप गोटात खळबळ उडाली आहे. एकंदरीतच इतर पक्षातील लोक धंगेकर यांच्या प्रचारात दिसून येत आहेत. (An activist of Prashant Paricharak is campaigning for Ravindra Dhangekar of Congress in Pune)

भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्यात पोटनिवडणूक लागली आहे. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविण्यात आले आहे. दुसरीकडे, काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारात काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक तर आहेत. याशिवाय पूर्वाश्रमीचा धंगेकरांचा पक्ष असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्तेही त्यांच्या प्रचारात उतरले आहेत. याच मुद्यावर पाच लोकांना मनसेतून निलंबित करण्यात आले आहे.

Prashant Paricharak's supporter
Solapur University : अहिल्यादेवी स्मारक समितीतून रोहित पवार आऊट; गोपीचंद पडळकर समर्थकांची वर्णी

दुसरीकडे पुण्याबाहेरचे इतर पक्षाचे लोकही धंगेकर यांचा प्रचार करताना दिसत आहेत. त्यात पंढरपूरचे भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे कट्टर समर्थक आणि पंढरपूर नगरपालिकेतील भाजपच्या नगरसेविकेचे पती पुण्यात काँग्रेसचा प्रचार करताना आढळून आले आहेत. नागनाथ रानगट असे परिचारक समर्थक कार्यकर्त्याचे नाव आहे. याबाबत त्यांनी सांगितले की, होय मी रवींद्र धंगेकर यांच्या प्राचारासाठी आलो आहे. कारण ते माझे जवळचे नातेवाईक आहेत. तसेच, पंढरपूर भागातून आलेले विद्यार्थी यांना प्रवेशापासून निवासापर्यंत, तसेच रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी धंगेकर यांच्या माध्यमातून मदत केलेली आहे.

Prashant Paricharak's supporter
Solapur News : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या जावयास अटक

चांगल्या व्यक्तीसाठी आणि नातेवाईकासाठी मी पुण्यात प्रचारासाठी आलो आहे. पण, मी माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा कट्टर कार्यकर्ता आहे आणि मी भाजपमध्येच आहे. भविष्यातही परिचारक यांच्यासोबतच राहणार आहे, असेही रानगट यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com