Supriya Sule News : सुप्रिया सुळे संतापल्या! केंद्रीय मंत्र्यांचा दिल्लीत जाऊन करणार 'करेक्ट कार्यक्रम'

Ncp News : जलजीवन मिशनच्या कार्यक्रमांना स्थानिक खासदार आणि आमदारांना बोलण्याचा प्रोटोकॉल आहे.
MP Supriya Sule Latest Marathi News
MP Supriya Sule Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

Supriya Sule : ''महाराष्ट्रात येऊन मिजास नाही, दाखवायची, तुझा कार्यक्रम पार्लमेंटमध्येच करते त्यामुळे सगळ्या देशाला कळेल की तुम्ही किती पाण्यात आहेत. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकारी अध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्र्यांचा समाचार घेतला.

इंदापूर तालुक्यात असणाऱ्या शेळगावमध्ये सुळे बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजपच्या (BJP) केंद्रीय मंत्र्यावर चांगल्याच संतापल्या. भाजपच्या 'मिशन 144'मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मागील आठवड्यात केंदीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांचा दौरा होता.

MP Supriya Sule Latest Marathi News
Pimpri-Chinchwad News : लाचखोरीत अटक दोघांना; मात्र, आयुक्तांनी निलंबन केले एकाचेच

जलजीवन मिशनच्या कार्यक्रमांना स्थानिक खासदार आणि आमदारांना बोलण्याचा प्रोटोकॉल आहे. मात्र, आम्हाला याबाबतचे निरोपच नाही, असा आरोप सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला. प्रल्हाद सिंह पटेल यांना याबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनीही 'उडते उडते खबर पहुंची होगी' असे म्हणाले होते. याचा चांगलाच समाचार सुप्रिया सुळे यांनी घेतला.

बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघातील गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने शेळगावमध्ये सुप्रिया सुळेंनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. पत्रकारांनी मला विचारले मंत्री आले होते, त्यांना प्रश्न विचारला की, खासदार सुळेंना का बोलावले नाही? तर ते म्हणाले, उडते उडते खबर पहुंची होगी... उडते उडते…तुम्ही चेष्टा करता का? तुम्ही बाहेरून महाराष्ट्रात येणार, आमची चेष्टा करून जाणार. हे चालणार नसल्याचेही सुळे म्हणाल्या.

MP Supriya Sule Latest Marathi News
Ajit Pawar News : 'ठाण्यात पोलीस संरक्षण दिलेले ते १०० जण कोण?'

त्यांचा करेक्ट कार्यक्रम दिल्लीतच करते, त्या मंत्र्याचा. इकडे येऊन मिजास दाखवायची नाही. ''हल्ला करूंगी तो तुम्हारे घर मे आके करूंगी. इथे नाही . मग म्हणतील काय तुमच्याकडे बोलावले. तुझा कार्यक्रम मी संसदेमध्ये करते म्हणजे देशाला कळेल की तू किती पाण्यात आहे. आता पार्लमेंटमध्ये दाखवते बरोबर. कारण तिथे ते खूपच चुका करतात. आम्ही तुमच्यासारखे उडते उडते नाही करणार. बघा आता पार्लमेंटमध्ये काय होते? मी व्हिडीओ पाठवेन तुम्हाला, असा इशारा सुळे यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com