Pune News: लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजप आणि अनुषंगाने महायुतीला मोठा फटका सहन करावा लागला आहे. महायुतीच्या जागा मोठ्या प्रमाणात घटल्या असून याची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करावं, अशी विनंती वरिष्ठांकडे केली आहे.
पदमुक्त होऊन आगामी विधानसभा निवडणुकसाठी पक्ष संघटना बळकट करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला आहे. यावरून आता खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुणे शहरातील ज्या भागांमध्ये पाणी साठवून नुकसान झालं होतं. त्या भागाची पाहणी त्यांनी केली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, एकाच वेळी पुणेकरांना खूप सार्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. एकीकडे गुन्हेगारी वाढत आहे. ड्रग्ज प्रकरण समोर येत आहेत आणि आता पुणेकरांना पाणी तुंबण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. हे पूर्णपणे ऍडमिनिस्ट्रेशन फेलियर आहे. सातत्याने आम्हाला अशा प्रकारचे दौरे करायला लागणार हे दुर्दैवी आहे.
केंद्र सरकारकडून जी स्मार्ट सिटी ची योजना राबवण्याचे जाहीर करण्यात आलं होतं. त्यामध्ये पहिल्या काही शहरांमध्ये पुण्याचा समावेश होता. त्यामुळे अपेक्षा होत्या सरकारकडून मात्र त्या अपेक्षांचा भंग झाला आहे. शहरात वाढलेल्या अतिक्रमणांमुळे लोकांच्या घरांमध्ये पाणी जात आहे. त्यामुळे सरकारला विनंती आहे की ही अतिक्रमणे तातडीने हटवावी अन्यथा भविष्यात आणखी भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी चिंता सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
पुणे शहरामध्ये भाजपचे 98 नगरसेवक गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता असताना देखील पुण्याच्या झालेल्या या अवस्थेला सर्वस्वी सरकार जबाबदार आहेत. त्यामुळे या सर्व समस्यांवर उपाययोजना करावी, यासाठी मी आज आयुक्तांची भेट घेणार आहे. कारण सत्ताधारी व्यग्र आहेत. घर फोडा, पक्ष फोडा आणि आता त्यांचे कमी खासदार निवडून आलेत म्हणून ते वाढवण्यात ते व्यग्र आहेत. सत्तेचे नंबर वाढवायला त्यांना वेळ आहे. म्हणत सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
यांच्याकडे सत्तेचे नंबर्स वाढवण्यासाठी वेळ आहे, मात्र सामान्य जनतेकडे लक्ष देण्यास वेळ नाही, हे अत्यंत असंवेदनशील असं ट्रिपल इंजिन सरकार असल्याची टीका सुळे यांनी केली. पुण्याच्या खासदारांना मंत्रिपद मिळाले आहे, ते पुण्याच्या समस्यांकडे लक्ष देतील, अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.