मावळ तालुक्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर मावळ विधानसभा मतदारसंघावर भारतीय जनता पार्टाने दावा केला आहे. त्यामुळे मावळमध्ये विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरुन वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या मावळ विधानसभेमध्ये अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके आहेत. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस देखील महायुतीमध्ये आहे. मात्र आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कलगीतुरा रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महायुतीत मावळची जागा आपल्याला मिळेल म्हणून भाजपने तयारी सुरु केली आहे. रविंद्र भेगडे यांचा 'भावी आमदार' असा उल्लेख असलेले बॅनर झळकले आहेत. मावळच्या पंचक्रोशीत हा चर्चचा विषय ठरला आहे.
मावळ विधानसभेत भाजपचे निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ तालुक्यात 'भावी आमदार फिक्स आमदार' अशा आशयाचे फ्लेक्स लावण्यात आले आहे. आता मावळ तालुक्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केल्याचे चित्र दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.