Supriya Sule : नागालँडमध्ये भाजप-राष्ट्रवादी सत्तेत एकत्र,सुळे म्हणाल्या,''फडणवीसांकडे १०५ आमदार तरी..''

NCP News : शिंदे फडणवीस सरकारनं अर्थसंकल्पात ओव्हर कमिटमेंट दिल्या आहेत.
 Supriya Sule
Supriya SuleSarkarnama

Pune News : महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमध्ये एनडीपीपी-भाजप युतीला पाठिंबा दिला. नागालँडमध्ये एनडीपीपीला 25 आणि भाजपला 12 जागांवर विजय मिळवला. 60 जागांच्या या विधानसभेत एनडीपीपी-भाजपला आधीच स्पष्ट बहुमत मिळालेलं असतानाही राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा देण्याचं ठरवलं. यावरुन शरद पवार यांनी स्वत: भूमिका स्पष्ट करुन देखील राष्ट्रवादीवरची टीका थांबलेली नाही. आता खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी शुक्रवारी (दि.१०) महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची महापालिका कार्यालयात भेट घेतली.यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुळे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

सुळे म्हणाल्या,नागालँडमध्ये राष्ट्रवादीनं भाजपला पाठिंबा दिलेला नाही. मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, त्यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे, भाजपला नाही असं स्पष्टीकरणही सुळे यांनी दिले. तसेच आज फडणवीस आणि भाजपकडे १०५ आमदार आहेत. असे असले तरी फायनल म्हणून एकनाथ शिंदे यांची सही असते असा टोलाही सुळे यांनी लगावला.

 Supriya Sule
Assembly Session: रासायनिक खते खरेदी करताना जात सांगावी लागणार; विरोधक आक्रमक; मुनगंटीवारांनी लढवला किल्ला

सुळे पुढे म्हणाल्या, पुण्याचे पालकमंत्री असताना अजित पवार दर शुक्रवारी बैठका घेत असत. पण आता ही सिस्टीम बंद झाली आहे. गेले काही महिन्यांपासून महापालिकेत नगरसेवक नाहीत. त्यामुळे इथे येऊन कचरा पाणी याबाबत आम्हाला महापालिका आयुक्तांशी चर्चा करावी लागत आहे असंही त्या म्हणाल्या.

तसेच उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसानी विधानसभेत गुरुवारी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर बोलताना सुळे यांनी मी बजेट वाचलेलं नाही. पण जे बघण्यात आलं, त्यात ओव्हर कमिटमेंट या सरकारने दिले आहे. याचवेळी पंतप्रधानांनी जी लाईन दिली आहे. त्याच्याविरोधात हे बजेट आहे. कोणाच्या नावाने योजना देऊ नका, ही पंतप्रधानांची विनंती असते. पण नमो हे नाव मी जेव्हा एका योजनेला वाचलं, तेव्हा मला समजलंच नाही की, ही योजना त्यांना कशी आवडेल असा टोलाही सुळे यांनी शिंदे फडणवीस सरकारला लगावला.

 Supriya Sule
Womens Reservation: महिला आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांच्या मुलीचे दिल्लीत उपोषण; काय आहे प्रकरण?

राज्य सरकारने अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. महिलांना आता एसटी प्रवासांत ५० टक्के सूट मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्पीय भाषणात ही योजना जाहीर केली आहे. यावर सुळे म्हणाल्या, ज्या एसटीमधून तुम्ही डिस्काउंट देत आहात. त्याच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होतो आहे का बघायला पाहिजे अशी टीका त्यांनी यावेळी केली. या बजेटमध्ये निधी कुठून येणार हे देखील पाहायला हवे असंही त्या म्हणाल्या.

...ऑनग्राउंडवर हे लोकं गेलेच नाही!

अवकाळी पावसाचा राज्यातील विविध भागातील शेतकरी वर्गाला फटका बसला होता.यावर सरकारने तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. यावर सुळे म्हणाल्या, सगळे होळी खेळण्यात व्यस्त होते. अवकाळी पावसामुळे जे नुकसान झाले तिथे ऑन ग्राउंडवर हे लोकं गेलेच नाही असा हल्लाबोलही केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com