Baramati Lok Sabha Seat : ठरलं ! बारामतीत नणंद विरुद्ध भावजय हाय व्होल्टेज सामना होणार; सुनेत्रा पवारांचे पत्र...

Supriya Sule Vs Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्या कामाचा लेखाजोखा प्रसिद्ध...
Baramati Lok Sabha Seat
Baramati Lok Sabha SeatSarkarnama
Published on
Updated on

Pune News : गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात दररोज काही ना काही नव्या घडामोडी घडत आहेत. या मतदारसंघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात नक्की कोणता उमेदवार निवडणूक लढविणार, याबाबत सर्वांनाच मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. खासदार सुळे यांच्या विरोधात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चादेखील काही दिवसांपासून सुरू आहे. (Latest Marathi News)

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा बालेकिल्ला अशी ओळख बारामतीची आहे. पवार यांनी राजकारणात पाऊल ठेवल्यापासून या मतदारसंघातून कोणत्याही राजकीय पक्षाला विजय मिळविता आलेला नाही. मागील लोकसभेच्या निवडणुकीतदेखील या मतदारसंघातून उमेदवार उभा करत खासदार सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्याचा जोरदार प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आला होता. मात्र, तो अपयशी ठरला. आठ महिन्यांपूर्वी अजितदादांनी राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे फडणवीस सरकारला जाहीर पाठिंबा देत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्याचे बक्षीस म्हणून सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद तसेच मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारीदेखील देण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Baramati Lok Sabha Seat
NCP Politics : 'या' 15 जागांचा राष्ट्रवादीने घेतला आढावा, दावा पण करणार का ?

आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीच्या गडाला कोणत्याही परिस्थितीत सुरुंग लावून शरद पवार यांच्या उमेदवाराचा पराभव करण्याचा ध्यास भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मदतीने घेतला आहे. बारामती लोकसभेसाठी उमेदवार देणार असून, त्याला विजयी करण्याची जबाबदारी ही बारामती कळवणची आहे, काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत घातली होती. या पार्श्वभूमीवर खासदार सुळे यांना जोरदार टक्कर द्यायची असेल तर त्याच तोडीचा उमेदवार त्यांच्यासमोर असला पाहिजे, याची कल्पना भाजपसह अजित पवार यांना असल्याने या मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव जोरदार चर्चेत आले आहे.

सुनेत्रा पवार यांनीदेखील गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या गावांमध्ये जाऊन तेथील नागरिकांच्या गाठीभेटी घेत त्यांचे प्रश्न समजावून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार यांनी सुरू केला आहे. याबरोबरच विविध कौटुंबिक तसेच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आवर्जून उपस्थिती लावत सुनेत्रा पवार यांनी मतदारांशी जोडण्याचे आपले काम यापूर्वीच सुरू केले आहे. बारामतीमधून सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, आता या मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. सुनेत्रा पवार यांचे प्रचार परिचय पत्रक आता प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये सुनेत्रा पवार यांनी केलेल्या कामांचा उल्लेख करण्यात आला आहे. या परिचय पत्रकावर सुनेत्रा पवारांचा फोटो आहे. तसंच 'वहिनी, तुम्ही हे केलं पण सांगितलं नाही', असा उल्लेखदेखील करण्यात आला आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांची उमेदवारी बारामतीमधून निश्चित मानली जात आहे.

Baramati Lok Sabha Seat
Loksabha Election 2024 : सुनेत्रा पवार बारामती लोकसभा लढविण्याची चर्चा; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "राजकारण म्हणजे..."

बारामतीमध्ये काही भागात यापूर्वीच जय पवार यांचे भावी खासदार म्हणून मोठे फ्लेक्स लावण्यात आले होते. बारामती, शिरूर, सातारा, रायगड या महत्त्वाच्या चार जागांवर सध्या अजित पवार यांनी दावा सांगितला आहे. यामध्ये बारामती आणि शिरूर लोकसभेची निवडणूक अजितदादा यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केलेली आहे. बारामती लोकसभेमध्ये यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी केलेल्या कामाची माहिती देणारा विकासरथ फिरत होता. त्यातच आता सुनेत्रा पवार यांचा परिचय पत्रदेखील समोर आलं आहे. तसेच अनेक जाहीर कार्यक्रमांमध्ये सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मी असे दोघे एकत्र काम करू आणि बारामतीचा विकास करू, असे सूतोवाच केले होते.

मागील लोकसभेच्या निवडणुकीत (Lok Sabha Election) भाजपने ए फॉर अमेठी आणि बी फॉर बारामती या जागा जिंकण्याचा संकल्प सोडला होता. त्यापैकी अमेठी जागा तर भाजपला मिळाली. मात्र, अनेक प्रयत्न करूनदेखील बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा मिळवण्यात भाजपला यश आलेले नाही, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत अजितदादांच्या मदतीने बी फोर बारामती असा विजय मिळवण्याचा संकल्प भाजपने बोलून दाखवलेला आहे.

आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार (Sunetra-Pawar) यांचे प्रचार परिचय पत्रक प्रसिद्ध करण्यात आलंय. त्यात सुनेत्रा पवारांनी केलेल्या कामांचा उल्लेख आहे. परिचय पत्रकावर सुनेत्रा पवारांचा फोटो आहे. तसंच वहिनी, तुम्ही हे केलं पण सांगितलं नाही, असा उल्लेखही आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांचेच नाव जवळपास निश्चित होण्याची दाट शक्यता आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com