Loksabha Election 2024 : सुनेत्रा पवार बारामती लोकसभा लढविण्याची चर्चा; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "राजकारण म्हणजे..."

Supriya Sule On Ajit Pawar : "कुटुंबाला राजकारणात कशाला आणता?" असा सवाल सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना विचारला आहे.
supriya sule sunetra pawar
supriya sule sunetra pawarsarkarnama
Published on
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. बारामतीत लोकसभेला खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या सामना रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच सुनेत्रा पवार यांनीही लोकसभा निवडणुकीला उतरण्याचे संकेत दिले आहेत. तर, अजित पवारांकडून बारामतीतील जनतेला भावनिक साद घालण्यात येत आहे. यावर "राजकारणात नाती नसतात, जबाबदारी असते,", अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे. ( Sunetra Pawar Vs Supriya Sule Baramati Loksabha Election 2024 )

supriya sule sunetra pawar
Maratha Reservation : भुजबळांना धक्का? जरांगे-पाटलांच्या 'या' मागणीवर मंत्रालयात काम सुरू

पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "राजकारण म्हणजे भातुकलीचा खेळ नाही आहे. राजकारणात नाती नसतात जबाबदारी असते. नाती ही प्रेमाची असतात. मी नाती आणि माझ्या कामांची कधीही गल्लत करत नाही. माझी प्रेमाची नाती जरी रक्ताची नसली, तरी प्रचंड आहेत. ही प्रेमाची, विश्वासाची आणि रक्ताची नाती असतात."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"नाती ही नेहमी माझ्यासाठी राहतीलच. पण, माझं व्यावसायिक आयुष्य, वैचारिक भूमिकेत मी लहानाची मोठी झाले आहे. माझ्यासाठी ही लढाई वैयक्तिक नाहीतर वैचारिक आहे. माझी लढाई भाजप आणि त्यांच्या चुकीच्या निर्णयाविरोधात आहे. भाजप आघाडीत जे कोणी चुकीच्या विचारांत काम करतात, त्यांच्याशी माझी लढाई आहे," असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.

supriya sule sunetra pawar
Sanjay Raut : "शाहांबरोबर 'मातोश्री'त बंद खोलीत चर्चा झाली नाही", मुख्यमंत्र्यांच्या दाव्यावर राऊत प्रत्युत्तर देत म्हणाले...

'कुटुंबातील सर्वजण माझ्याविरोधात गेले आहेत,' असं वक्तव्यही अजित पवारांनी केलं होतं. याबाबत विचारलं असता, सुप्रिया सुळे म्हणाल्या, "आमचं सगळं कुटुंब थोडीच राजकारणात आहे. आमच्या कुटुंबाचा काय संबंध? सगळे आपल्याआपल्या पद्धतीनं काम करतात. कुटुंबाला राजकारणात कशाला आणता? रिश्ते दिलं से बनते है..."

supriya sule sunetra pawar
Aaditya Thackeray : "राहुल गांधींना पंतप्रधान व्हायचं असेल तर भाजपत जावे, कारण...", आदित्य ठाकरेंचं विधान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com