Shivsena News : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण गमावल्यांनतर ठाकरे ॲक्शन मोडवर; मोठे राजकीय पाऊल उचलले

Uddhav Thackeray : एकीकडे न्यायालयीन लढाईसोबत ठाकरे यांना राजकीय मैदानातही करिष्मा दाखवावा लागणार आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray News : शिवसेना आणि धनुष्यबाण गमाविल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजकीय 'बेरीज' करीत, भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून मुंबईत काहीशी ताकद असलेल्या समाजवादी पक्षासह आम आदमी पक्ष आणि आजाद समाज पक्ष प्रमुख नेत्यांना बोलावून ठाकरे यांची चर्चा केली. पक्ष संघटनेच्या पडझडीनंतरही मुंबई महापालिका निवडणुकीत अस्तित्त्व राखण्यासाठी ठाकरे यांची धडपड आहे.

पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर शिंदे गटाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊन दोन हात करण्याचा ठाकरे यांचा इरादा आहे. मात्र, पक्षच शिंदे यांच्याकडे गेल्याने महापालिका निवडणुकांना मुहूर्त लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा काळात निवडणुका झाल्यास मुंबई महापालिकेतील ठाकरे वर्चस्वाला सुरूंग लागण्याची भीती आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे इन अॅक्शन मोड : 'लवकरच ठाण्यात येईन', म्हणाले...

एकीकडे न्यायालयीन लढाईसोबत ठाकरे यांना राजकीय मैदानातही करिष्मा दाखवावा लागणार आहे. त्याच हेतुने पारंपरिक विरोधक असलेल्या समाजवादी पक्षाच्या नेत्यांना ठाकरे यांनी थेट मातोश्रीवर बोलावून पाहूणचार केला.

तेव्हाच मुंबईत काही भागांत विस्तार करण्याच्या तयारीत असलेल्या 'आप' च्या नेत्यांनाही ठाकरे यांनी साद घातली. ठाकरे यांनी आप आणि सपाच्या मुंबईतील (Mumbai) प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केली. सपाचे नेते स्वामी प्रसाद मौर्या, आजाद समाज पक्षाचे कैलास जैसस्वार, आपचे माजी मंत्री राजेंद्र पाल गौतम हे ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीला उपस्थित होते. या पक्षांसोबत हातमिळवणी करण्याची ठाकरे यांची तयारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचे अमित शाहांच्या टीकेला जोरदार प्रतिउत्तर; म्हणाले...

दरम्यान, आप व सपा नेत्यांसोबतच्या बैठकीनंतरही भाजप (BJP) नेत्यांनी ठाकरे यांच्यावर टीकेची संधी सोडली नाही. ठाकरे, सपा, आपच्या नेत्यांच्या बैठकीनंतर नव्या चर्चेना सुरवात झाली आहे. "महापालिका निवडणुकांत भाजपविरोधी पक्ष एकत्र येऊन लढणार असल्याचे जयस्वार यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीनंतर उद्धव ठाकरे आता इतर पक्षांनाही एकत्र करण्याच्या तयारीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com