MPSC
MPSC Sarkarnama

MPSC Student Protest: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; परीक्षा पुढे ढकलली

MPSC Chairman meeting Mumbai decision: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी टि्वट करीत सरकारला अल्टिमेटम दिले होते. "पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे.
Published on

आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही २५ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्याने पुण्यात एमपीएससीच्या (MPSC) विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु होते. या आंदोलनाला यश आले आहे. विद्यार्थ्यांच्या आक्रमक भुमिकेमुळे प्रशासनाने ही परीक्षा पुढे ढकलली आहे. तीन दिवसापासून हे आंदोलन सुरु होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आजच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेची तारीख लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल, असा निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयानंतर आंदोलक विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.

MPSC
Pune Porsche Accident Case: पोलिसांनी न्यायालयात सादर केली 'एका गुन्ह्याची गोष्ट': दोषारोपपत्रात पाचशे फोटोंचा 'अल्बम'

आंदोलनाचे राजकीय पडसाद उमटले आहेत. आंदोलनस्थळी काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी भेट देऊन आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली. आंदोलनाला पाठिंबा देत सरकारला सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी टि्वट करीत सरकारला अल्टिमेटम दिले होते. "पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार," असा इशारा शरद पवारांनी दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com