MPSC Exam : पुण्यात MPSC उमेदवार पुन्हा रस्त्यावर ; 'नाना पटोले, अतुल लोंढे..'

MPSC Exam : हा बदल हा २०२३ पासूनच लागू करावा या साठीही विद्यार्थी आंदोलन करीत आहेत.
MPSC
MPSC Sarkarnama
Published on
Updated on

MPSC Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परिक्षा जु्न्या अभ्यासक्रमानुसारच घ्यावी, या मागणीसाठी आज पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी बालगंधर्व रंगमंदिराजवळ आंदोलन सुरु केले आहे. युवक काँग्रेसने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यापूर्वी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनात भाजपचे आमदार, गोपीचंद पडळकर, अभिमन्यू पवार उपस्थित होते.

एमपीएससी परिक्षेचा अभ्यासक्रम बदलला आणि राज्यात याबाबतच्या आंदोलनांना सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात ‘राज्यसेवा मुख्य नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करावा’ या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलने केली तर यानंतर एमपीएससी आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे बदल हा २०२३ पासूनच लागू करावा या साठीही विद्यार्थी आंदोलन करीत आहेत.

आता आज पुन्हा ‘राज्यसेवा मुख्य नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करावा’ या मागणीसाठी बालगंधर्व चौकात आंदोलनास सुरवात झाली आगे. त्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अतुल लोंढे या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे समजते.

MPSC
Nashik : पक्ष, धनुष्यबाण गेल्यानंतर ठाकरे गटावर पहिला गुन्हा दाखल ; एका शब्दामुळे मोठा नेता अडचणीत..

राज्यसेवा परीक्षेतील बदल २०२५ पासून लागू करण्याच्या मागणीसाठी एमपीएससी उमेदवारांतर्फे ३१ जानेवारी रोजी ‘अराजकीय साष्टांग दंडवत’ आंदोलन करण्यात आले होते. पुण्यातील अलका टॉकिज चौकात हे आंदोलन केलं होत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षेत बदल करण्याचे जाहीर केले आहे. तसेच हे बदल २०२३ पासून लागू होणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. मात्र २०२३ ऐवजी २०२५पासून हे बदल लागू करण्याची राज्यभरातील उमेदवारांची मागणी आहे. या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी काँग्रेसतर्फे दोनवेळा आंदोलन करण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com