Chinchwad by-election : चिंचवड पोटनिवडणुकीचा फटका फक्त चिंचवडलाच, उर्वरित शहराला नाही

Chinchwad by-election News : पालिकेची मुदत संपल्याने सध्या शहरात प्रशासक राजवट सुरु आहे.
Pcmc News
Pcmc NewsSarkarnama

Pimpri-Chinchwad News : चिंचवड पोटनविडणुकीच्या आचारसंहितेचा फटका हा संपूर्ण शहराला म्हणजे भोसरी आणि पिंपरी या विधानसभा मतदारसंघांना बसणार नसल्याचे पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांनी काल (ता.४) स्पष्ट केले. त्यामुळे संपूर्ण शहरात बंद झालेल्या जनसंवाद सभा पुन्हा सुरु होणार का याकडे पिंपरीकर आणि भोसरीकरांचे लक्ष लागले आहे.

या आचारसंहितेचा पहिला फटका शहरातील जनसंवाद सभांना बसून त्या बंद झाल्याने शहरवासियांचे नागरी प्रश्न सुटण्यास आणखी बाधा आली आहे. पालिकेची मुदत संपल्याने सध्या शहरात प्रशासक राजवट सुरु आहे. त्यामुळे नगरसेवकांमार्फत सुटणाऱ्या समस्यांसाठी आता रहिवाशांना पालिका कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

Pcmc News
Amravati Graduate Election Results : '' लीड कव्हर करून देण्यासाठी खोक्यांची ऑफर..''; लिंगाडेंचा गौप्यस्फोट

ते करावे लागू नये म्हणून याअगोदरचे पालिका आयुक्त राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय दर आठवड्याला जनसंवाद सभा घेण्यास सुरवात करून त्यातून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरु केला होता. मात्र, त्यानंतर आलेले आयुक्त शेखरसिंह (Shekhar Singh) यांनी आठवड्यातून नाही, तर पंधरवड्यातून या सभा घेण्याचा निर्णय घेतला. नंतर, तर पंधरवड्याने होणाऱ्या व प्रश्न सुटत नसल्याची मोठी ओरड असलेल्या या सभा चिंचवड पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे बंदच झाल्या होत्या. त्या अद्याप बंदच आहेत.

दरम्यान, आचारसंहितेमुळे बंद झालेल्या जनसंवाद सभेवरून मोठा गोंधळ उडाल्याने त्याबाबत स्पष्टीकरण देणारा आदेश काल शेखरसिंह यांनी काढला. त्यात त्यांनी आचारसंहिता ही पूर्ण शहरात लागू नाही, असे स्पष्ट केले. ती चिंचवड विधानसभा मतदारसंघात असून भोसरी व पिंपरी हे शहरातील उर्वरित दोन मतदारसंघ त्याला अपवाद असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.

Pcmc News
Sanjay Raut : 'बिनविरोध'साठी मुख्यमंत्र्यांचा फोन,राज ठाकरेंचं पत्र,राऊतांचं सूचक वक्तव्य; म्हणाले...

त्यामुळे या दोन मतदारसंघातील विकासकामांच्या निविदा काढणे, त्या स्वीकारणे, त्याचा कार्यारंभ आदेश देणे तसेच चालू व प्रस्तावित कामे पूर्ण करण्याबाबत कसलेच निर्बंध किमान महिनाभर राहणार नसून फक्त संपूर्ण शहराशी निगडीत विकासकामाच्या निविदेवर ते असणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com