MP Murlidhar Mohol News : मंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी मुरलीअण्णांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले हा पुणेकरांचा सन्मान !

Pune Loksabha Election 2024 : एक 'बुथ कार्यकर्ता केंद्रीय मंत्री होतो', हे भाजपमध्येच होऊ शकते, पुण्यासह,महाराष्ट्र आणि देशाच्या विकासासाठी काम करणार मुरलीधर मोहोळांची ग्वाही
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol Sarkarnama

Pune News : माझ्या सारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला ज्याने बुथ स्तरावर काम केले. त्याला या पदावर काम करण्याची संधी मिळणे हे केवळ भाजपमध्येच होऊ शकते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात काम करण्याची संधी मिळणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे.'बुथ कार्यकर्ता केंद्रीय मंत्री होतो' हे भाजपमध्येच होऊ शकते.

इतकी मोठी संधी मला काम करण्याची दिली. या संधीचे सोने करत पुण्यासह,महाराष्ट्र आणि देशाच्या विकासासाठी काम करणार असल्याची ग्वाही मुरलीधर मोहोळांची रविवारी दिली. मंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी मोहोळ यांनी व्हिडीओ शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली.

हा केवळ माझा एकट्याचा नव्हे तर संपूर्ण पुणेकारांचा सन्मान आहे. सर्व पुणेकारांना यामुळे आनंद झाला आहे. तीस वर्षानंतर पुण्याला ही संधी मिळत आहे. पुणेकरांचे आभार मानतो. तुमच्यामुळेच माझा प्रवास इथपर्यंत आला आहे. आता नवीन जबाबदारी मिळत आहे. या नवीन जबाबदारीतून माझं पुणे असेल, महाराष्ट्र असेल एकूण देशाची सेवा करता येणार आहे. या नवीन संधीमुळे जबाबदारीची जाणीव निश्चितपणे करून देत आहे. ही मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे चांगले काम करायचे आहे.

माझे पक्ष नेतृत्व अमित शहा, जे.पी. नड्डा, नितीन गडकरी, (Nitin Gadkari) देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे या सर्वांचे आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे की, 2047 चा विकसीत भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी मी काम करणार आहे. प्रामाणिकपणे काम करणार आहे. माझ्या पक्षनेतृत्वाने, पुणेकरांनी काम करण्याची संधी दिली आहे. पुणेकारांना न्याय मिळाला आहे. या दिलेल्या संधीचे सोने करण्यासाठी अहोरात्र काम करत देशाचे नाव उंच करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

Murlidhar Mohol
Murlidhar Mohol : मुरलीधर मोहोळांचे मंत्रिपद ठरले! केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्रिपदी वर्णी?

मोहोळ यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर मोहोळ यांना पंतप्रधान कार्यालयाकडून त्याबाबतचा फोन आला. मोदी यांच्या बरोबर मंत्रि‍पदाची शपथ घेणाऱ्या 41 खासदारांसोबत पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ हे पंतप्रधान निवास्थानी उपस्थित देखील होते. मोहोळ यांना कोणते मंत्रिपद मिळणार याची चर्चा सुरू असताना केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री पदी मोहोळ यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com