Murlidhar Mohol : मुरलीधर मोहोळांचे मंत्रिपद ठरले! केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्रिपदी वर्णी?

PM Narendra Modi Oath Ceremony : मुरलीधर मोहोळ यांना कुस्तीसह वेगवेगळ्या खेळांची माहिती आहे. हे स्वतः पहिलवान आहेत.
Murlidhar Mohol
Murlidhar MoholSarkarnama

Murlidhar Mohol : पहिल्यांदाच खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात मंत्रि‍पदाची माळ पडली आहे. आज (रविवारी) संध्याकाळी ते मंत्रि‍पदाची शपथ घेतील. मोहोळ यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर त्यांना पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांना अधिकृत फोन आला. मंत्रि‍पदाची शपथ घेणाऱ्या 41 खासदारांसोबत मोहोळ पंतप्रधान निवास्थानी उपस्थित देखील होते. मोहोळ यांना कोणते मंत्रिपद मिळणार याची चर्चा सुरू असताना केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री पदी मोहोळ यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्रातून भाजपचे अवघे 9 खासदार विजयी झाले आहेत. भाजपची महाराष्ट्रात मोठी पडझड झाली. मात्र, पुण्याची जागा भाजप जिंकणार, याचा आत्मविश्वास आधीच पासूनच पुणे भाजपला होता. मुरलीधर मोहोळ Murlidhar Mohol यांनी तब्बल एक लाख 23 हजार येवढे मताधिक्य घेत विजय मिळवला.

मुरलीधर मोहोळ यांना कुस्तीसह वेगवेगळ्या खेळांची माहिती आहे. हे स्वतः पहिलवान आहेत. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करत त्यांनी आपल्या खेळाडूची चुणूक दाखवून दिली. खेळा विषयी जाणीव आणि खेळाडूंविषयी त्यांना अस्था आहे.

Murlidhar Mohol
Murlidhar Mohol : आमदारकीने दोनदा 'चकवा' दिलेल्या मोहोळांना केंद्रीय मंत्रीपदाची लाॅटरी! असा आहे राजकीय प्रवास

कुस्तीच्या मैदानातून राजकारणातून आलेल्या मुरलीधर मोहोळांनी पुणे महापालिकेत नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष, महापौरपद, पक्ष संघटनेत सरचिटणीस अशा यशाच्या एकामागून एक पायऱ्या चढल्या. दिल्लीतील नेतृत्वाने मोहोळांच्या नावावर पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीची मोहोर उमटवली . आणि विजय मिळवत त्यांनी त्यांच्यावरील विश्वास सार्थ ठरवला. आता नगरसेवक ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास झाला आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com