खेड तालुक्यात भर चौकात तरुणाचा गोळ्या घालुन खून..

घटनेतील आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून (Pimpri-Chinchwad Police) पथके रवाना करण्यात आली आहे.
Khed Murder Caes

Khed Murder Caes

Sarkarnama

खेड : खेड तालुक्यात चाकण परिसरातील शेलपिंपळगाव येथे भर चौकात गुरुवारी (ता.23 डिसेंबर) एका युवकाची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. जुन्या वादातुन हा खुन झाल्याचा अंदाज चाकण पोलीसांनी (Pimpri Police) व्यक्त केला आहे. याप्रकरणी योगेश दौंडकर याच्यासह चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागेश सुभाष कराळे ( वय 38, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

<div class="paragraphs"><p>Khed Murder Caes</p></div>
अकोल्यात सव्वा कोटींच्या साहित्यासह 65 हजार बायोडीझल जप्त; आरोपींना अटक

चाकण आणि परिसरात गेल्या महिन्यांपासुन निघृण खुनांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. शेलपिंपळगाव येथील मिलिंद बिअर शॉपी जवळ नागेश कराळे हे आपल्या चारचाकी वाहनात बसत असताना लगतच्या फोर्ड फिगो वाहनात दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी नागेशवर चार गोळ्या झाडल्या. यामध्ये नागेश गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर तत्काळ त्यांना चाकण येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मयत झाल्याचे घोषित केले.

<div class="paragraphs"><p>Khed Murder Caes</p></div>
सावधान : पिंपरी-चिंचवड बनतोय 'ओमिक्रॉन'चा हॉटस्पॉट

दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पहाणी केली असुन गिरीष बाळासाहेब कराळे यांच्या फिर्यादीवरुन योगेश दौंडकर याच्यासह चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून पथके रवाना करण्यात आली आहे. आरोपी योगेश दौंडकर आणि नागेश कराळे यांच्यात जुने वाद होते. या वादाला राजकिय पाठबळही असल्याची चर्चा शेलपिंपळगाव परिसरात आहे. या जुन्या वादाची फास अखेर खुनापर्यत पोहचली आणि गोळीबार करत नागेश कराळेचा खुन करण्यात आला आहे. खुनासाठी वापरण्यात आलेली पिस्तुल कशी आली यामध्ये दोघांच्या जुन्या वादात राजकिय पाठबळ आहे का? याबाबींकडे चाकण पोलीस कसे पहाणार हे पहावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com