सावधान : पिंपरी-चिंचवड बनतोय 'ओमिक्रॉन'चा हॉटस्पॉट

देशात ओमिक्रॉनची सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे.
Omicron Variant

Omicron Variant

Sarkarnama

पिंपरी : `ओमिक्रॉन`हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट पिंपरी-चिंचवडसह राज्यात वेगाने पसरू लागल्याने प्रशासनाची चिंता पुन्हा वाढली आहे. त्यातही पिंपरी-चिंचवड` ओमिक्रॉनचा हॉटस्पॉट`बनू लागल्याने महापालिका प्रशासन पुन्हा अधिक सतर्क झाले आहे. गुरुवारी (ता.23) चार पुरुष, दोन महिला व एक लहान मुलगी असे ओमीक्रॉनचे सात नवे रुग्ण शहरात आढळले. त्यामुळे ही रुग्णसंख्या 19 झाली आहे. वाढत्या ओमिक्रॉनमुळे पालिकेने नाताळ सण साजरा करण्यावर निर्बंध घातले आहेत. असेच ते नवीन वर्षाच्या स्वागतावर म्हणजे `थर्टी फर्स्ट`वरही येण्याची दाट शक्यता आहे.

राज्यात गुरूवारी ओमिक्रॉनचे (Omicron) 23 नवे रुग्ण आढळले. त्यातील 13 हे पुणे (Pune) जिल्ह्यातील आणि त्यातील सात पिंपरी-चिंचवडचेच (Pimpri Chinchwad) आहेत. काल शहरात कोरोनाचे (Corona) एकूण 52 नवे रुग्ण आढळले. हा आकडा हळूहळू पून्हा वाढू लागला आहे. त्याजोडीने थांबलेले मृत्यू पुन्हा सुरु झाले आहेत. काल उपचाराधीन एका कोरोना रुग्णाचा बळी गेला. 367 सक्रिय रुग्ण शहरात असून त्यातील 226 रुग्णालयात दाखल आहेत.

<div class="paragraphs"><p>Omicron Variant</p></div>
थरारक : भर चौकात पैलवानाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

ओमिक्रॉनमुळे कोरोनाचा आलेख शहरात पुन्हा वाढू लागला आहे. परदेशातून आलेले व त्यांच्या संपर्कात आलेल्यांना सध्या कोरोना व त्यातही ओमिक्रॉनचा प्रार्दूभाव होत आहे. परदेशातून आलेले व त्यांच्या संपर्कातील अशा एक हजार 325 जणांची कोरोना चाचणी कालपर्यंत पालिकेने केली. त्यात 27 परदेशी प्रवासी आणि त्यांच्या संपर्कातील 26 असे 53 कोरोना पॉझीटीव्ह सापडले. 53 मध्ये 10 परदेशातून आलेले, तर नऊ त्यांच्या संपर्कातील अशा 19 जणांना ओमिक्रॉन झालेला आहे. दरम्यान,19 पैकी 10 जण ओमिक्रॉनमुक्त झाले. तर 53 पैकी 35 जणांच्या दुसऱ्या कोरोना चाचणीचा अहवाल काल निगेटीव्ह आला आहे.

दरम्यान, राज्यातील वाढत्या ओमिक्रॉनमुळे राज्य शासन रात्रीच्या संचारबंदीसारखे काही निर्बंध आज पुन्हा लादण्याची शक्यता आहे. त्याअगोदरच पिंपरी महापालिकेने ते काल नाताळ तथा ख्रिसमस सणासाठी लागू केले आहेत. खबरदारी घेऊन व कोरोना नियमांचे पालन करीत गर्दी न करता मास्क व सॅनिटायझरचा वापर करून हा सण साजरा करण्याचे आवाहन पालिका आय़ुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.

<div class="paragraphs"><p>Omicron Variant</p></div>
निवडणुका लांबणार? आता उच्च न्यायालयाचीच थेट मोदी अन् आयोगाला सूचना

यानिमित्त चर्चमध्ये आसनक्षमतेच्या निम्मेच उपस्थित राहतील, चर्च परिसरात दुकाने, स्टॉल न लावण्यासही बजावण्यात आले आहेत. तसेच फटाकेबाजी, मिरवणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवरही बंदी घातली गेली आहे. वाढत्या ओमिक्रॉनसह एकूणच कोरोना रुग्णांचाही वाढता आलेख ध्यानात घेता नववर्ष स्वागत साजरे करण्यावरही 31 डिसेंबरला असेच काहीसे गर्दी न करण्याचे निर्बंध हॉटेलांवर येण्याची दाट शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com