Murlidhar Mohol : मंत्रिपद मिळताच मोहोळांनी महिनाभरात पुणेकरांना दिलं मोठं 'गिफ्ट'

Pune International Airport will finally open on July 14 : लोकसभा निवडणुकीनंतर मंत्रिपद मिळताच मोहोळांनी महिनाभरात पुणेकरांना मोठ गिफ्ट दिलं आहे. या गोष्टी करीता पुण्यात CISF चे अतिरिक्त जवान देखील दाखल झाले आहेत.
Murlidhar Mohol
Murlidhar MoholSarkarnama

Pune News : पुणे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनलवरून सेवा पुरविण्यासाठी चार महिन्यांनी अखेर मुहूर्त सापडला आहे. पुणे शहराचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे पुण्याचे नवीन टर्मिनल आता सुरू होणार आहे.

चार महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असतानाच 10 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर हे टर्मिनल कार्यान्वित होऊन त्याचा वापर केला जाईल असे वाटत होते. मात्र गेल्या चार महिन्यांपासून हे टर्मिनल सुरू होण्यामध्ये सतत काही ना काहीतरी विघ्न निर्माण होत होती.

टर्मिनलचे काम झालेले नसतानाही केवळ लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या टर्मिनलचे उद्घाटन उरकून घेतल्याची टीका काँग्रेसकडून केली जात होती. पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन झालेले हे टर्मिनल कधी कार्यान्वित होणार याबाबत विचारणा देखील केली जात होती. टर्मिनलची चाचणी पूर्ण करून ते 15 एप्रिलला सुरू करण्याचे विमानतळ प्राधिकरणाचे नियोजन होते. मात्र, हवाई वाहतूक सुरक्षा विभागाची (बीसीएएस) मंजुरी न मिळाल्याने नवीन टर्मिनल सुरू झाले नाही. हवाई प्रवाशांना जुन्या टर्मिनलवरील गैरसोयींचा सामना करावा लागत होता.

Murlidhar Mohol
Pune Hit And Run: ‘हिट ॲण्ड रन’ घटनेने पुणे पुन्हा हादरले; दोन पोलिस कर्मचाऱ्यांना उडवले, एकाचा मृत्यू

लोकसभेच्या निवडणुकीत मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) हे पुण्याचे खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. त्यानंतर राज्यमंत्री पदाची जबाबदारी घेतलेल्या मोहोळ यांनी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल सुरू करण्यासाठी लक्ष घालत जोरदार प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. येत्या रविवारी 14 जुलैला हे टर्मिनल सुरू होणार आहे.

हे टर्मिनल सुरू करण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) अतिरिक्त जवानांची आवश्यकता होती. मात्र ते उपलब्ध होत नसल्याने हे टर्मिनल सुरू होत नव्हते. ही बाब लक्षात घेत मुरलीधर मोहोळ यांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेत यावर चर्चा केली होती. त्यांच्या या प्रयत्नांना आता यश आले आहे. नवीन टर्मिनलसाठी अतिरिक्त जवानांना परवानगी मिळाली असून सीआयएसएफचे जवान पुणे विमानतळावर दाखलही झाले आहेत. त्यामुळे आता या टर्मिनल सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Murlidhar Mohol
Sharad Pawar : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात पवारसाहेबांचं शक्तिप्रदर्शन! 20 जुलैला देणार मोठा धक्का

याबाबत अधिक माहिती देताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, नव्या टर्मिनलमध्ये इनलॅंड बॅगेज सिस्टिम बसवण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. याची तांत्रिक प्रक्रिया वेगाने सुरु असून तातडीने पूर्ण केली जात आहे. त्यामुळे नवे टर्मिनल कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 14 जुलैपासून नवे टर्मिनल पुणेकरांच्या सेवेत असणार आहे.

पहिला बोर्डिंग पास केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ देणार

नवीन टर्मिनल कार्यान्वित करताना या टर्मिनलच्या पहिल्या प्रवाशाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते बोर्डिंग पास देण्यात येणार आहे. एअर इंडियाच्या प्रवाशाला 14 जुलैला दुपारी १ वाजता बोर्डिंग पास देत हे नवे टर्मिनल कार्यान्वित केले जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com