मुस्लिम मनसैनिक नाराज; राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर पक्षात राजीनामा सत्राला सुरुवात

MNS | Raj Thackeray | Gudhi Padwa melawa | : पुण्यात झाली राजीनामा सत्राला सुरुवात
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मुस्लिम समाजाबद्दल घेतलेल्या भूमिकेनंतर मुस्लिम मनसैनिक नाराज झाले असून पक्षात राजीनामा सत्राला सुरुवात झाली आहे. यात पुण्यातील वॉर्ड क्रमांक ८४ चे शाखाध्यक्ष माजीद अमीन शेख यांनी राजीनामा दिला आहे. तर कल्याणमधील मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांच्यासह अनेक मुस्लिम मनसैनिक राजीनाम्याच्या तयारीत आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढी पाडवा मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, मात्र राज्यातील मश्जिदींवर लागलेले भोंगे उतरवावेच लागतील. या सरकारला हा निर्णय घ्यावाच लागेल, असे म्हटले होते. शिवाय झोपडपट्ट्यांमधील मदरशांमध्ये एकदा धाडी टाका, तुम्हाला काय काय गोष्टी हाताला लागतील ते कळेल, असेही वक्तव्य त्यांनी केले होते. ठाकरेंच्या या विधानानंतर पक्षातील मुस्लिम मनसैनिकांनी राज ठाकरेंना जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

Raj Thackeray
प्रदेशाध्यक्षांचा इन्कार, पण कॉंग्रेसचे आमदार नाराज; आज हायकमांडला भेटणार!

पुण्यातील वॉर्ड क्रमांक ८४ चे शाखाध्यक्ष माजीद अमीन शेख यांनी पत्र लिहुन राजीनामा सादर केला आहे. त्यांनी आपल्या राजीनामा पत्राक म्हंटले आहे की, मी २००९ पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काम करत असून पुण्यात शाखाध्यक्ष आहे. माझ्या प्रभागात हिंदू-मुस्लीम बांधव एकत्रित राहतात. मी माझ्या भागात पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. पण गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी सभेत घेतलेल्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे.

Raj Thackeray
"शेतकऱ्यांच्या प्रश्नी समाधानी नाही; खदखद केव्हाही बाहेर पडेल"

शिवाय मागील काही दिवसापासून बेरोजगारी, महागाई, शिक्षण यासारखे विषय असताना जात, धर्म या विषयांवर भर दिला जात आहे. या कारणास्तव मी कोणाच्याही दबावाखाली न येता स्वच्छेने पुण्याचे शहराध्यक्ष आणि विभागाध्यक्ष यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. माजिद शेख यांच्यानंतर अनेक मनसे मुस्लिम कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यानंतर कल्यामध्ये देखील मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त "आमच्या भावना कुठे व्यक्त करायच्या, आज समाजाला सामोरे जाताना जाणिव झाली. १६ वर्षांचा फ्लॅश बॅक आठवला आणि डोळ्यात पाणी आलं" अशी भावनिक पोस्ट केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com