"शेतकऱ्यांच्या प्रश्नी समाधानी नाही; खदखद केव्हाही बाहेर पडेल"

Bacchu Kadu | Mahavikas Aaghadi | Akola | : बच्चू कडूंनी वाढवले 'मविआ'चे टेन्शन
"paragraphs"
"paragraphs"Sarkarnama
Published on
Updated on

अकोला : महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारमधील राज्यमंत्री आणि अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी स्वतःच्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. "शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल मी समाधानी नाही. केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार, मी मंत्री जरी असलो तरी शेतकऱ्यांसाठी फार समाधानी नाही आणि त्याची खदखद केव्हाही बाहेर पडेल असे परखड मत करत बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीचे टेन्शन वाढविले आहे.

अकोल्यात एका कार्यक्रमात बच्चू कडू यांनी प्रखट मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांची लूट थांबली पाहिजे, कर्जमाफी किती झाली हे महत्त्वाचे नाही. कारण पाच वर्षात आपण ५० हजाराने शेतकऱ्यांना लुटतो आणि २० हजार रुपयांची कर्जमाफी देतो. खरतर एकीकडे तूर सोयाबीन आयात करून त्याचे भाव पाडण्यात आले. शेतकऱ्यांना हमीभाव देईल अशी औकात कुठल्याही पक्षाची अथवा कोणत्याही सरकारची नाही असेही बच्चू कडू म्हणाले.

"paragraphs"
मी छत्रपती शाहू महाराजांचा वंशज मात्र छगन भुजबळ हे खरे वारस!

नोकरी भरतीत होत असलेल्या घोटाळ्याबाबत बच्चू कडू म्हणाले, भरती प्रक्रिया ही पारदर्शक व्हायला पाहिजे, यासाठी मी मंत्रिपद सोडेन असेही ते म्हणाले. दरम्यान मी शिवसेना का सोडली यावरही त्यांनी उत्तर देताना ते म्हणाले, एका शौचालयाच्या भ्रष्टाचारावर माझी दखल न घेतल्याने मी शिवसेना सोडली आणि नाना पाटेकरचा फॅन असल्याने त्यांचा चित्रपट पाहून मी प्रहार पक्ष स्थापन केल्याचेही बच्चू कडू म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com