नगरपंचायत निवडणूक: माळशिरसमध्ये भाजपा-राष्ट्रवादीत तर नातेपुतेमध्ये आघाड्यांमध्ये चुरस

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjeetsinh Mohite-Patil) यांनी श्रीपूर-महाळुंग नगरपंचयातीमध्ये स्वतंत्र आघाडी स्थापन केली आहे.त्यामुळे येथे भाजपामध्येच दोन गट पडल्याचे चित्र आहे.
रणजितसिंह मोहिते-पाटील

रणजितसिंह मोहिते-पाटील

सरकारनामा

पुणे : माळशिरस व नातेपुते या नव्याने स्थापन झालेल्या दोन नगरपंचयातीच्या निवडणुकीमध्ये काटे की टक्कर अशी लढत आहे. माळशिरसमध्ये (Malshiras) भाजपा (BJP),राष्ट्रवादी (NCP), कॉंग्रेससह (Congress) स्थानिक आघाडीचे उमेदवार रिंगणात आहेत. येथील १३ जागांसाठी ४५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माळशिरसमध्ये भाजपा विरुध्द राष्ट्रवादी अशी थेट लढत होत असली तरी स्थानिक महाराष्ट्र विकास आघाडीनेही (MVA) आव्हान निर्माण केले आहे.

<div class="paragraphs"><p>रणजितसिंह मोहिते-पाटील</p></div>
महापौर मोहोळांची अशीही शिवभक्ती; स्वखर्चातून उभारताहेत सव्वादोन टनांचा सिंहासनाधिष्ठ पुतळा !

नातेपुते नगरपंचयातीच्या निवडणुकीमध्ये स्थानिक आघाड्यांचा जोर आहे.नातेपुते नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी ५४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये प्रमुख लढत सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांच्या जनशक्ती विकास आघाडी विरुध्द भानुदास राऊत यांच्या नागरी विकास आघाडी अशी होत आहे. येथे अपक्ष उमेदवारांची संख्याही अधिक आहे.त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडेच लक्ष लागले आहे.

<div class="paragraphs"><p>रणजितसिंह मोहिते-पाटील</p></div>
विद्यापीठाचे कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरवणार ?

श्रीपूर-महाळुंग नगरपंचयातीमध्ये भाजपा-राष्ट्रवादीत थेट लढत होत असून भाजपा नेते रणजितसिंह मोहिते पाटील यांची स्वतंत्र आघाडी आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, नातेपुते, माढा,वैराग व श्रीपूर-महाळुंग या पाच नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे.

दरम्यान पाच नगरपंचायतीपैकी श्रीपूर-महाळुंग नगरपंचयातीच्या निवडणुकीकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. येथे भाजप विरुध्द राष्ट्रवादी यांच्यात थेट लढत होत असली तरी भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी या निवडणुकीत स्वतंत्र आघाडी स्थापन केली आहे.त्यामुळे येथे भाजपमध्येच दोन गट पडल्याचे चित्र आहे.

श्रीपूर-महाळूंग नगरपंचायतीसाठी प्रथमच निवडणूक होत असून निवडणुकीत १३ जागांसाठी ८४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.यामध्ये भाजपाचे १३, राष्ट्रवादी १३, शिवसेना ७, वंचित ३ आणि रिपाई एका जागेवर लढत आहे.याशिवाय मोहिते पाटीलांनी सर्व १३ जागांवर आपले अपक्ष उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे येथील निवडणुकीत भाजपा विरुध्द भाजपा असा अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. येथील निवडणुकीसाठी भाजपाकडून माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर, जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचे प्रयत्न आहेत तर राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे हे प्रय़त्न करत आहेत. अपक्ष उमेदवारांसाठी भाजपा आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्वतंत्र यंत्रणा कामाला लावली आहे.मत विभागणीचा नेमका कुणाला फटका बसतोय आणि फायदा कुणाला होतोय हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com