थरारक : भर चौकात पैलवानाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

जुन्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे.
Wrestler shot dead

Wrestler shot dead

Sarkarnama

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या (Pimpri Chinchwad Police) हद्दीतील हत्यांचे सत्र अजूनही सुरूच आहे. गुरूवारी रात्री खेड तालुक्यातील शेलपिंपळगावमध्ये गुरूवारी रात्री भर चौकात हत्येचा थरार घडला. दबा धरून बसलेल्या चौघांनी पैलवानाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली असून हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत.

नागेश कराळे (Nagesh Karale) (वय 37) असे या तरूणाचे नाव असून तो तालीम चालवत असे. गुरूवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर शेलपिंपळगावमधील एका दुकानाजवळ दबा धरून बसले होते. नागेश कराळे हा आपल्या चारचाकी वाहनात बसल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक गोळीबार केला. नागेशवर चार गोळ्या झाडण्यात आल्याचे समजते.

<div class="paragraphs"><p>Wrestler shot dead</p></div>
न्यायालयातील बॉम्बस्फोटामागे पाकिस्तान? गुप्तचर यंत्रणांना आधीपासून होती खबर

गंभीर जखमी झालेल्या नागेशला तातडीने चाकण येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच नागेशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केल्याचे समजते. चौघेही फरार असून पोलिस शोध घेत आहेत.

दरम्यान, मागील दहा दिवसांत पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ही तिसरी हत्या असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बुधवारी तळेगावमध्ये एका अकरावीतील विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली होती. तर शनिवारी पिंपळे गुरवमध्ये भरदिवसा एकावर गोळीबार झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com