Lok Sabha Election: शिवाजी महाराजांनी स्वप्नात येऊन निवडणूक लढवण्याचा दृष्टांत दिला, नामदेवराव जाधवांचा दावा, मतदारसंघही सांंगितला

Namdevrao Jadhav News: प्रा. नामदेव जाधव यांनी (Namdev Jadhav) आपण बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र, निवडणूक लढणार हे जाहीर करताना त्यांनी अजब दावा केला आहे.
Namdevrao Jadhav
Namdevrao JadhavSarkarnama
Published on
Updated on

Baramati Lok Sabha Election 2024: प्रा. नामदेव जाधव यांनी (Namdev Jadhav) आपण बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र, निवडणूक लढणार हे जाहीर करताना त्यांनी दावा केला आहे. जाधव यांनी, छत्रपत्री शिवाजी महाराजांनी (Chatrapati shivaji maharaj) स्वप्नात येऊन आपल्याला ही निवडणूक लढवण्याचा दृष्टांत दिल्याचं म्हटलं आहे. एवढेच नव्हे तर मागील जन्मात आपण लखुजी जाधवराव होतो. ज्याप्रमाणे महाराजांना गुप्तधन सापडलं त्या पद्धतीनं आपल्यालादेखील जमिनीखाली गुप्तधन सापडेल, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल मागील काही दिवसांपूर्वी आक्षेपार्ह वक्तव केल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाधव यांना काळं फासलं होतं. तेव्हा ते खूप चर्चेत आले होते. जाधव यांनी शरद पवारांवर अनेक आरोप केले होते. मराठा समाजावर शरद पवारांनी अन्याय केला असल्याचं वक्तव्यही जाधव यांनी केलं होतं. पवारांवर वारंवार टीका केल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. अशातच आता त्यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय घेताना त्यांनी केलेल्या अजब दाव्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नामदेवराव जाधवांनी नेमका काय दावा केला?

नामदेव जाधव म्हणाले, "बारामती मतदारसंघ (Baramati Constituency) हा शहाजी राज्यांच्या जाहगिरीचा प्रदेश आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या निर्मितीचं केंद्रबिंदू आहे. इथेच महाराजांनी शपथ घेतली. पहिला किल्ला ताब्यात घेतलेला तोरणा किल्लादेखील इथेच आहे. संभाजी महाराजांचं (Sambhaji Maharaj) जन्मस्थळ असलेला पुरंदर किल्लादेखील याच मतदारसंघात आहे. परंतु इथल्या कोणत्याही किल्ल्यांचा विकास झालेला नाही. या किल्ल्यांचा विकास व्हावा, अशी इच्छा आहे. मी निवडणूक लढावी अशी अनेकांची इच्छा होती. असं असतानाच मला पहाटे शिवाजी महाराजांची पुण्यतिथी असलेल्या दिवशी म्हणजेच 3 एप्रिलला दृष्टांत झाला. महाराजांनी माझ्या स्वप्नात येऊन मला निवडणूक लढवण्याचा दृष्टांत दिला."

Namdevrao Jadhav
Vishwajit Kadam News: सांगलीसाठी माझा हट्ट अन् आग्रह, तातडीने निर्णय घ्या, विश्वजित कदमांचा इशारा

दरम्यान, बारातमीजवळ असलेल्या 4 किल्ल्यांवर जाणारे हायवे, रोपवे, हेलिपॅड असावं, असं केल्यास 4 लाख तरुणांना रोजगार मिळेल. या तरुणांच्या कुटुंबांना पैसे मिळतील आणि बारामती मतदारसंघात कोणीही बेरोजगार राहणार नाही, हे सगळं शिवाजी महाराजांनी साडेचारशे वर्षांपूर्वी तयार करून दिलं असल्याचंही जाधव म्हणाले. जाधव यांनी हा दावा केला असला तरी त्यांच्या बोलण्यात सत्य कितपत आहे. याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहे. कारण जाधव हे प्रसिद्धीसाठी काहीही बोलतात, अशी टीकाही त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असते.

Namdevrao Jadhav
Supriya Sule News: सुळेंनी मानले आंबेडकरांचे आभार; एकत्रित काम करण्याची दिली ग्वाही

कोण आहेत नामदेवराव जाधव?

नामदेवराव जाधव हे प्राध्यापक, लेखक आणि व्याख्याते आहेत. ‘शिवाजी द मॅनेजमेंट गुरू’ हे पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. जाधव हे आपण जिजाऊंचे वंशज असल्याचा दावा करतात. मागील काही दिवसांपूर्वी जाधव यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती.

(Edited By Jagdish Patil)

R

Namdevrao Jadhav
Prakash Ambedkar And Sharad Pawar : वंचितचा बारामतीबाबत मोठा निर्णय; आंबेडकरांची पवारांना साथ

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com