Devendra Fadnavis : 'आम्ही राजकारणी लोकं म्हणजे कंत्राटी कामगार, दर पाच वर्षांनी...'; फडणवीसांचं बारामतीत विधान

Namo Rojgar Melava Baramati : 'नमो महारोजगार' मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमधील विकासकामांचं कौतुक केलं.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Baramati News: बारामतीमध्ये आज 'नमो महारोजगार' मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह आदी नेते एकाच मंचावर आले होते. या मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून झालेल्या राजकारणाची राज्यात चर्चा झाली. (Marathi News)

या 'नमो महारोजगार' मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमधील विकासकामांचं कौतुक करत 55 हजार पदे या ठिकाणी अधिसूचित करण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच हा मेळावा जाहीर झाल्यापासून माध्यमांना काम लागलं आणि आमच्या मेळाव्याला प्रसिद्धी करून दिल्याबद्दल त्यांनी माध्यमांचे आभार मानले.

याबरोबरच राजकारणात काम करणारे आम्ही कंत्राटी कामगार आहोत. चांगलं काम केलं नाही तर जनता घरी बसवते आणि चांगलं काम केलं तर आम्हाला पुन्हा कंत्राट मिळतं, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devendra Fadnavis
Ajit Pawar News : "...तोपर्यंत मी गप्प बसणार नाही," अजितदादांचं शरद पवार, मुख्यमंत्री अन् फडणवीसांसमोर विधान

बारामतीमधील 'नमो महारोजगार' मेळाव्यासाठी अजित पवारांनी मोठी मेहनत घेतली आहे. या मेळाव्यामधून तरुणांच्या हाताला काम देण्यात येणार आहे. बारामतीचं बस स्थानक एखाद्या एअरपोर्टप्रमाणे बनवलं आहे. बारामतीचं पोलिस मुख्यालय आणि बस स्थानक हे सरकारी वाटत नाहीत, तर ते एखाद्या खासगी कंपनीचं ऑफिस असल्यासारखं वाटतंय, असं म्हणत फडणवीसांनी अजित पवारांचे तोंडभरून कौतुक केलं.

याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना विनंती करत "दादा तुम्हाला विनंती आहे की, एवढ्या चांगल्या इमारती तुम्ही बारामतीमध्ये बनवल्या आहेत, तर राज्यातदेखील अशाच इमारती झाल्या पाहिजेत. या इमारती पाहून अधिकारी म्हणतील की मला बारामतीलाच पोस्टिंग द्या. अजितदादांनी स्वतः लक्ष घालून या इमारती बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आपल्या पोलिस विभागाच्या जेवढ्या इमारती आहेत, त्यांचं पीएमसी म्हणून तुम्हालाच नियुक्त करावं, असं वाटतंय. मात्र, दादा म्हणतील पीएमसी कशाला खातंच द्या, पण मी ते देणार नाही, असा चिमटादेखील फडणवीसांनी अजित पवारांना काढला.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Devendra Fadnavis
Parbhani Administration News : प्रशासनातील अधिकाऱ्यांना परभणीची ओढ; घोटाळे बहाद्दरांना पुन्हा नियुक्ती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com