Sharad Pawar : बारामतीकरांची झलक! महायुतीच्या कार्यक्रमात पवार उभे राहताच शिट्ट्या, घोषणा अन् टाळ्यांचा कडकडाट...

Namo Rojgar Melava in Baramati : बारामतीतील नमो रोजगार मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार एकाच व्यासपीठावर
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Baramati Political News : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरोधात भूमिका घेतल्याने बारामती लोकसभा निवडणुकीचे रन चांगलेच तापले आहे. बारामतीतून खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच बारामतीतील महायुतीच्या कार्यक्रमात वेगळेच चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे बारामतीकरांच्या मनात दादा की ताई, नेमके कोण याचीच चर्चा जोर धरू लागली आहे. (Sharad Pawar)

बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे शनिवारी (ता. 2) नमो रोजगार मेळावा पार पडला. महायुतीच्या या कार्यक्रमासाठी विरोधातील राज्यसभेचे खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. यामुळे बारामतीच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार एकाच व्यासपीठावर आले होते. या वेळी सत्कारावेळी बारामतीकरांनी केलेला जल्लोष राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे.

Sharad Pawar
Eknath Shinde : निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री शिंदेंचं भराडी देवी चरणी साकडं; म्हणाले...

महायुतीच्या या कार्यक्रमात प्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पावर (Ajit Pawar) यांचे सत्कार करण्यात आले. त्यावेळी सभागृहात संगीताचा जल्लोष सुरू होता. या सत्कारांनंतर शरद पवारांचे नाव पुकारण्यात आले. त्यावेळी मात्र संगीताचा आवाज कमी पडेल एवढ्या मोठ्या आवाजात बारामतीकरांनी जल्लोष केला. या वेळी शिट्ट्या, घोषणा आणि टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. महायुतीच्या कार्यक्रमात शरद पवारांसाठी झालेल्या स्वागताच्या चित्राने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. यातूनच आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील बारामतीबाबत वेगवेगळे आडाखे बांधले जाऊ लागले आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या (Sharad Pawar) विरोधात जात महायुतीशी घरोबा केला. पवार कुटुंबातील पडलेली फूट ही बारामतीकरांसाठी वादाचा नाही तर भावनिक प्रश्न निर्माण झाला. दरम्यान, पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजितदादांकडे गेले, तर पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार हे पक्ष नाव तर तुतारी हे चिन्ह मिळाले. चिन्ह मिळताच राष्ट्रवादीतील दोन्ही गटांतील दरी वाढली आहे. दोन्ही गटांवर आरोप-प्रत्याराेप केले जात असल्याचे पाहायला मिळत आहेत. आता आगामी लोकसभा निवडणुकीत कोण, कशी रणनीती आखणार याकडे लक्ष आहे.

R

Sharad Pawar
Mahadev Jankar : खासदार होऊन दिल्लीला जाणारच; जानकरांनी एका शब्दातच सांगितलं...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com