Eknath Shinde : निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री शिंदेंचं भराडी देवी चरणी साकडं; म्हणाले...

Anganewadi Bharadi Devi : आंगणेवाडी येथील यात्रोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आई भराडी देवीचे दर्शन घेतले.
CM Eknath Shinde in Bharadidevi Temple
CM Eknath Shinde in Bharadidevi TempleSarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg Political News : लोकसभा निवडणुकीचे बिगुल काही दिवसांत वाजण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलेली आहे. मतदारसंघाचा आढाव घेतानाच मतदारांनाही चुचकारण्याच्या सर्व संधींचे सोने केले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रा काळात सर्व सुविधा पुरवण्याचे आदेश प्रशासनाला देले आहेत. तसेच आई भराडी देवीच्या चरणी राज्याच्या कल्याणाचे साकडेही घातले आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी यात्रेला अनेक ठिकाणांहून भाविक येतात. यात्रा काळात भाविकांची गैरसोय होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. भाविकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगून कष्टकरी आणि शेतकऱ्यांवर आलेले संकट दूर होऊ दे, त्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, त्यांना सुखी आणि संपन्‍न कर, असे साकडे आई भराडी देवी चरणी घातले.

CM Eknath Shinde in Bharadidevi Temple
Anil Deshmukh : मोठी बातमी ! भाजपच्या बड्या नेत्यावर अनिल देशमुखांचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ

आंगणेवाडी येथील यात्रोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आई भराडी देवीचे दर्शन घेतले. या वेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar), उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी किशोर तावडे आदी उपस्थित होते. या वेळी श्री भराडी देवी यात्रोत्सव समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी शिंदेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

CM Eknath Shinde in Bharadidevi Temple
Ajit Pawar News : अजित पवारांशी संबंधित शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करा; आर्थिक गुन्हे विभागाची कोर्टाला विनंती

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आंगणे कुटुंबीयांचा मंदिर विकासामध्ये असणारा सहभाग कौतुकास्पद असून, इतरांनी त्यांचा आदर्श घ्यावा. आई भराडी देवीच्या आशीर्वादाने मला मुख्यमंत्रिपद सांभाळण्याची आणि जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. दीड वर्षामध्ये शासनाने अनेक कल्याणकारी निर्णय घेतले आहेत. सिंचनाचे प्रकल्प वाढवून कोकणातील अनुशेष भरून काढण्यासंदर्भात अधिवेशनात नुकतीच चर्चा झाली. कोकणात शक्य तितके बंधारे, लघू व मध्यम सिंचन प्रकल्प निर्माण करून वाहून जाणारे पाणी अडविणे आवश्यक आहे.

आरोग्य, दळणवळण अशा अनेक क्षेत्राचा विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मुंबई-सिंधुदुर्ग (Sindhudurg) हा ग्रीन फिल्ड रस्ता बनविण्यात येणार आहे. यामुळे वेळेची आणि इंधनाची बचत होऊन रोजगारासह पर्यटन व्यवसाय वाढीस लागणार आहे. कोकण विकास क्षेत्र प्राधिकरणाच्या माध्यमातूनदेखील शेतकरी आणि नागरिकांना अनेक सुविधा पुरविण्यात येणार असून, कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदेंनी या वेळी दिली.

(Edited by Sunil Dhumal)

R

CM Eknath Shinde in Bharadidevi Temple
Pandharpur News : आमदार पुत्राला मराठा समाजाने विचारला जाब; ‘तुम्ही ओबीसी प्रमाणपत्र काढलं; समाजासाठी काय केले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com